केतळी चितळेला न्यायालयाकडून दणका; स्वत:च मांडली बाजू

अभिनेत्री केतकी चितळेने वादग्रस्त पोस्ट करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गरळ ओकली आहे.
Ketaki Chitale Latest Marathi News
Ketaki Chitale Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेने वादग्रस्त पोस्ट करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी गरळ ओकली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शनिवारी केतकीला अटक केली आहे. त्यानंतर रविवारी सकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Ketaki Chitale Latest Marathi News)

केतकी चितळेविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांतही तिच्याविरोधात तक्रार आल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. केतकीने एका वकिलाची शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियात शेअर केली. (Ketaki Chitale in Police Custody)

Ketaki Chitale Latest Marathi News
केतकी चितळे विरोधात शिवसेनेनेही बाह्या सरसावल्या!

या पोस्टमध्ये अतिशय आपत्तीजनक अशा टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तिला शनिवारी ठाणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

केतकीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील घेतला नाही. तिने स्वत:च न्यायालयात बाजू मांडली. मी पोस्ट केवळ फॉरवर्ड केली आहे. सोशल मीडियात मत मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही का, असा सवाल तिने न्यायालयात उपस्थित केल्याचे समजते. त्यानंतर तिला कोठडी सुनावण्यात आली.

Ketaki Chitale Latest Marathi News
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केतकी चितळेचे कान टोचले!

दरम्यान, केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर अशी हिन दर्जाची टीका केल्यानंतर आता राज्यभरातून केतकीविरोधात प्रतिक्रीया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या केतकीवर संताप व्यक्त केला आहे.

Ketaki Chitale Latest Marathi News
अभिनयापेक्षा केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमधून जास्त चर्चेत

'कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,'' अशा शब्दांत राज यांनी सुनावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com