Kharghar Heatstroke News : 'खारघर दुर्घटनेची अनेक कारणं, लोकं आप्पासाहेब यांना..' बावनकुळे म्हणाले...

Chandrashekhar Bawankule News : लोकं आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ अप्पासाहेबांना...
BJP News : Chandrashekhar Bawankule News :
BJP News : Chandrashekhar Bawankule News : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील खारघरमधील घटनेमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खारघरच्या घटनेवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीच विरोधकांवर केली होती. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP News : Chandrashekhar Bawankule News :
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे किती आमदार; त्यांनी आत्मपरिक्षण करावे...शंभूराज देसाई

हा कार्यक्रम नियोजित होता. या कार्यक्रमासाठी काही लोकं २४ तास आधीच आले होते. ही घटनेला अनेक कारणे आहेत. आमची नक्कीच आमची जबाबदारी आहे. कारण सरकारने व्यवस्था केली होती. लोकं आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ अप्पासाहेब यांना पाहण्यासाठी आले होते, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. घटना होऊन गेली, यापुढे काय करता येईल आणि या परिवाराच्या मागे सरकार कशा प्रकारे उभे राहील हे बघायला हवं, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

BJP News : Chandrashekhar Bawankule News :
Chandrashekhar Bawankule : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत बावनकुळे म्हणतात, 'चर्चा थांबवा..'

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे थोडे कौतुक झाले तर संजय राऊतांचा आनंद गगनात मावेनासा होतो. राज ठाकरे यांच्याबद्दल संजय राऊत काय काय बोलत राहतात, अशा पद्धतीनं बोलणे योग्य तरी आहे का?" असे बावनकुळे म्हणाले.

"राज ठाकरे यांची टीका नेहमी प्रॅक्टिकल असते, कुठेही हवेत गोळीबार नसतो. ते आमच्यावर सुद्धा टीका करत असतात. राऊत यांना सत्तेत राहायची सवय झाली होती, मात्र आता ती गेली आणि आता संघटना काही वाढत नाही," असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com