फरार किरण गोसावी पुढे आला; म्हणाला मी समीर वानखेडेंना...

प्रभाकर साईल हा माझ्या सोबत काम करत होता.
Kiran Gosavi, Aryan Khan
Kiran Gosavi, Aryan Khansarkarnaam

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केलेल्या विविध आरोपानंतर फारार किरण गोसावी पुढे आला आहे. साईल यांनी केलेले सर्व आरोप त्यांने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फेटाळून लावले. आपण एनसीबीचे विभागीय संचालक समिर वानखेडे (Sameer Wankhede) यांना ओळखत नसल्याचेही त्याने म्हटले आहे.

गोसावी म्हणाला, मला विविध फोन आल्याने मी फोन बंद केला. समीर वानखेडे यांना मी ओळखत नाही. मी त्यांना फक्त टीव्हीवर पाहिले होते. मी पहिल्यांदाच पंचनाम्यामध्ये सहभाग घेतला. एनसीबीने केलेला पंचनामा मी वाचून पाहिला होता. त्यावर १० जणांची नावे होती. आर्यन खाननेच मला फोन करायला सांगितले होते. त्यानेच त्याच्या मॅनेजरचा नंबर दिला होता. त्यामुळे मी फोन केला होता. सॅम म्हणून मला एका व्यक्तीचा फोन आला होता. आर्यनने मला पुजाचा नंबर दिला असल्याचे गोसावी यांने सांगितले. मात्र, मी फोन केला त्यावेळी त्यांनी फोन उचलला नाही.

Kiran Gosavi, Aryan Khan
समीर वानखेडे यांच्या मूळ गावातील कागदपत्रे काय सांगतात? : चुलत्याने सांगितली वस्तुस्थिती

प्रभाकर साईल हा माझ्या सोबत काम करत होता. मात्र, त्याने केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत गोसावीने ते फोटाळून लावले. यावेळी गोसावीला त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल विचाले असता तो म्हणाला, माझ्यावर पुण्यात एक गुन्हा दाखल होता. मात्र, क्रूझ पार्टीप्रकरणानंतर त्यामध्ये मला लुकाउट नोटीस बजावण्यात आली. मला धमकीचे अनेक फोन आले. तुला जेलमध्ये मारून टाकू असे धमकावण्यात आल्याने मी फोन बंद करुन ठेवला होता. पोलिसांनी तपास सुरु केला तर मी नक्कीच समोर येईल, असे गोसावी यांने सांगितले.

Kiran Gosavi, Aryan Khan
मोठी घडामोड : एनसीबीनं तातडीनं समीर वानखेडेंना दिल्लीत बोलावलं

नोकरी लावून देतो असे सांगत गोसावीने पैसे उकळले आहेत. त्या प्रकरणात त्याच्यावर पुणे आणि ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. क्रूझ पार्टीप्रकरणानंतर तो फरार आहे. त्याचे शेवटचे लोकेशन त्रिपुरामधील आगरतळा येथे होते. दरम्यान, या प्रकरणातील पंच किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या साईलने रविवारी ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईलने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com