मोठी घडामोड : एनसीबीनं तातडीनं समीर वानखेडेंना दिल्लीत बोलावलं

क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अडचणीत आले आहेत.
Sameer Wankhede
Sameer Wankhede sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे अडचणीत आले आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने केलेल्या गंभीर आरोपांनंतर एनसीबी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अखेर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. वानखेडेंना आज सायंकाळी तातडीने दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांना आज सायंकाळी तातडीने दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे. याचबरोबर उद्या एनसीबीचे पथक दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह दोन निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. वानखेडेंवरील आरोपांची चौकशी हे पथक करणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.

वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी आज दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.

आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. एनसीबीवरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टि्वट करीत वानखेडेंबाबत गैाप्यस्फोट केला आहे. यातच प्रभाकर साईल हा आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्याने या प्रकरणात मुंबई पोलीसही उडी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sameer Wankhede
समीर वानखेडेंना दणका! एनसीबीकडून खात्यांतर्गत चौकशी सुरू

दरम्यान, क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र आज सादर केले. न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये, कारवाईवर होऊ नये, यासाठी एनसीबीने हे पाऊल उचलल्याचे समजते.

Sameer Wankhede
29 वर्षांत 54 बदल्या झाल्याने आयएस अधिकारी वैतागला अन् म्हणाला...

या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केलेल्या आरोपाची न्यायालयाला माहिती दिली आहे. स्वतंत्र साक्षीदाराने साक्ष फिरवल्याप्रकरणाची कोर्टाला माहिती देण्यात आली. एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. समीर वानखेडे स्वत: न्यायालयाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com