नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया : सोमय्या यांचा आरोप

प्रशासनातील अधिकारी आता भाजपकडून लक्ष्य
Vishwas Nangare Patil
Vishwas Nangare Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे माजी खासदार हे रोज नवीन आरोपांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करत असतात. आता मात्र त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर नजर वळवली आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. नांगरे हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राजकीय नेते आरोप-प्रत्यारोपांत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शक्यतो टीका करत नाहीत. मात्र सोमय्या यांच्या टिकेमुळे प्रशासनातही चुळबूळ सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नांगरे पाटील यांना मुंबईतील महत्वाचे पद मिळाले. मुंबईच सहपोलिस आय़ुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. मुंबई पोलिस आयुक्तांनंतर हे पद महत्वाचे असते.

सोमय्या यांचा राग का?

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या हे मुंबईहून कोल्हापूरला निघाले असता त्यांना त्यांच्या निवासस्थानी अडविण्यात आले. ही कारवाई नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नांगरे पाटलांनी मला बेकायदेशीररित्या घरात कोंडून ठेवले. स्थानिक पोलिसांना तेच सूचना देत होते, असा सोमय्या यांनी केला.

Vishwas Nangare Patil
मोठी बातमी : हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांचा १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

सोमय्या आज दिल्लीत होते. तेथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टिकेची झोड उठवली. हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. पंधराशे कोटी रुपयांचे कंत्राट हसन मुश्रीफ यांनी दादागिरी करून स्वतःच्या लोकांना दिले. कायद्याची तरतूद नसतानाही स्वतःच्या जावयाला असं कंत्राट दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार आहे. हे सगळं काम अँटिकरप्शने करायला पाहिजे होतं, पण यांनी अँटिकरप्शनलाच करप्ट केलं आहे. राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करते म्हणून आम्हाला केंद्राकडे जावे लागते, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com