५८ कोटी नाही! आता सोमय्यांनीच सांगितला 'त्या'वेळच्या पैशांचा आकडा: पोस्ट व्हायरल

सोमय्यांचा मुलगा नील सोमय्यांनी देखील मदतीसाठी आवाहन केले होते.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama

मुंबई : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी निधी गोळा करण्याचे अभियान भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी २०१३-१४ मध्ये सुरू केले होते. या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपालांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र हा निधी राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भारतीय दंड विधान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमय्यांचा हा फसवणुकीचा आकडा ५८ कोटी रुपयांच्या घरात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. या सगळ्या आरोपांवर सोमय्यांनी मात्र मागील दोन दिवसांपासून मौन बाळगले आहे. कालच्या दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी या पैशांबद्दलच्या पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देत तिथून काढता पाय घेतला होता. केवळ आपण कोणताही घोटाळा केलेला नसून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र याच सगळ्या घडामोडीं दरम्यान सोमय्या यांची एक जुनी फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.

यात सोमय्या यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी ट्विट करत आपण राज्यपालांना भेटलो असल्याचे सांगितले होते. या भेटीत आपण राज्यपालांना विक्रांत युद्ध नौका वाचविण्यासाठी विनंती केली. तसेच 'विक्रांत शहिद स्मारक' उभारण्यासाठी मुंबईकर १४० कोटी रुपयांची देणगी देण्यासाठी तयार आहेत, असेही सांगितले होते.

तसेच १० डिसेंबर रोजी २०१३ रोजी चर्चगेटवर दुपारी २ वाजता निधी संकलन अभियान असल्याचे किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी फेसबुक पोस्टवरुन सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com