Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर ठाकरेंपाठोपाठ शिंदे गटही? 'या' नेत्याबाबत मोठं विधान

Kirit Somaiya: 'त्या' घोटाळ्यात उद्धव ठाकरेंची ५० टक्के भागीदारी होती का?
Kirit Somaiya, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Kirit Somaiya, Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

Kirit Somaiya On Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक टि्वट केलं होतं. त्यात त्यांनी उध्दव ठाकरेंसह रश्मी ठाकरेंवरही कारवाईचे संकेत दिले होते. तसेच रविवारी (दि.2)थेट रेवदंडा गाठत रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार देखील दिली आहे. आता सोमय्या यांच्या निशाण्यावर ठाकरेंपाठोपाठ शिंदे गटही आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण किरीट सोमय्या यांनी शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान केलं आहे. (Kirit Somaiya On Uddhav Thackeray latest news)

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर देखील भाष्य केलं. सोमय्या म्हणाले,प्रताप सरनाईकांनी जो गुन्हा केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सरनाईक हे निर्दोष आहेत असं सांगितलं होतं. त्यामुळे त्या घोटाळ्यात उद्धव ठाकरेंची ५० टक्के भागीदारी होती का? असं असेल तर अरविंद सावंतांनी तसं एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यायला हवं अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते व खासदार अरविंद सावंत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातून दूर सारण्याचा प्रयत्न?

उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईकांनी घोटाळा केला आहे, त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी प्रत मला मिळाल्यास मी निश्चित पाठपुरावा करणार असं सूचक वक्तव्य सोमय्यांनी केलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या( Kirit Somaiya) यांच्या निशाण्यावर ठाकरेंपाठोपाठ शिंदे गटही आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Gulabrao patil : गुलाबराव पाटलांनी सांगितलं शिवसेना फुटीचं कारण; ठाकरेंनी ऐकलं नाही म्हणून...

अरविंद सावंतांची सोमय्यांवर बोचरी टीका

'' किरीट सोमय्या हा काही महात्मा नाहीये. त्याला आधी प्रश्न विचारा की, त्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आणि जे त्यांच्या पक्षात गेले, त्याचं काय झालं? हे तो सांगत नाही. तोपर्यंत किरीट सोमय्याच्या कोणत्याही वक्तव्याची दखल मी नव्हे तर कुणीच घेऊ नये, असं मला वाटतं. ज्यांना आपण नालायक म्हणतो अशी ही लायकी नसलेली माणसं आहेत'' अशी बोचरी टीका सावंत यांनी केली आहे.

रश्मी ठाकरेंविरोधात सोमय्या आक्रमक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित मालकीच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील १९ बंगल्यांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी रेवदंडा पोलिस ठाण्यात रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी रश्मी यांच्याविरोधात गुन्हा नोंद केल्यास ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

रेवदंडा पोलिसांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल असे आश्वासन मला दिले आहे असं सोमय्या यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com