सोमय्यांनी आधी हसत पोझ दिली अन् आता फोटोग्राफरलाच आणलं गोत्यात!

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील नगरविकास खात्यात जाऊन फाईल चाळतानाचा फोटो वादात अडकला आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांचा मंत्रालयातील नगरविकास खात्यात जाऊन फाईल चाळतानाचा फोटो वादात अडकला आहे. सोमय्या हे निवांत खुर्चीत बसून कागदपत्रे पाहत होते. त्या खुर्चीत बसून हसत पोझ देताना ते दिसतात. त्यानंतर सोमय्या यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर आता सोमय्या यांनीही तो फोटो काढणाऱ्या त्या व्यक्तीविरोधातच पोलिसांत (Mumbai Police) तक्रार देण्याचा निर्णय घेणार आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अवैध बांधकामांचा सुमारे 18 कोटी रुपयांचा दंड माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला होता. हा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला होता. त्यासाठी नगरविकास सचिव भूषण गगराणी यांनी तयार केलेली टिपणी सोमय्या यांनी पाहिली आणि तिचा फोटोही घेतला. यावेळचा सोमय्या यांचा खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला आहे.

Kirit Somaiya
'राष्ट्रपतींकडूनही टिपू सुलतानचं कौतुक; भाजप त्यांचाही राजीनामा मागणार का?'

त्यानंतर आता सोमय्या हे दुपारी दीड वाजता मरीन लाईन्स पोलीस ठाण्यांत जाऊन तक्रार देणार आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. मंत्रालय हे संरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा विभाग आणि नगरविकास विभागाने फोटो काढण्यासाठी त्या व्यक्तीला का व कशी परवानगी दिली, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आरटीआयच्या गोपनीयतेचा भंग केला असून माझ्या झेड दर्जाच्या सुरक्षा नियमांचाही भंग केल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सोमय्या यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आले. सचिवांनीही तातडीने हालचाली करत आता संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. दोन नियोजनकार आणि एक कक्ष अधिकारी यांचा यात समावेश आहे. यापेक्षा वरिष्ठ अधिकारीही आता सरकारच्या रडारवर येणार का, याची आता चर्चा सुरू आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येता भाजपनेही (BJP) सरकारवर हल्ला चढविला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अधिकाऱ्यांवर कारवाई म्हणजे मोगलाई असल्याचे मत व्यक्त केले आहे. सोमय्या हे भाजपचे माजी खासदार आहेत. त्यांनी खुर्ची दिली तर काय बिघडलं? मनात आले आणि लगेच निलंबित करा, असे सुरू झाले आहे. या पूर्वी कुठला नेता हा अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसला नाही का, असा सवाल दरेकर यांनी विचारला. संबंधित अधिकाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर आम्ही सरकारचा निषेध करू, असा इशारा दरेकर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com