Kokan University of Fishery : मासे कोकणात, मत्स्य विद्यापीठ नागपुरात; डॉ. मुणगेकर समितीचा अहवाल कुणी दडपला?

Kokan Mla, Mp quite : मत्स्य विद्यापीठासाठी कोकणातील लोकप्रतिनिधी बोलत का नाहीत?
Kokan University of Fishery, Dr. Bhalchandra Mungekar
Kokan University of Fishery, Dr. Bhalchandra MungekarSarkarnama
Published on
Updated on

मत्य विद्यापीठ कुठे असावे, याचे उत्तर कुणी महाराष्ट्र सरकारला देईल का? हे सांगण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरला आहे. ज्या कोकणाला तब्बल 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे, जिथे माशांची वैविधता आणि विपुलता आहे, त्या कोकणातील विद्यार्थ्यांना मत्स्य शिक्षणासाठी नागपूरला जावे लागते. यापेक्षा वेगळे दुर्दैव ते काय?

या पार्श्वभूमीवर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 मे 2008 रोजी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. कोकणात जागतिक दर्जाचे मत्स्य विद्यापीठ स्थापन करावे, हा ही समिती स्थापन करण्यामागचा उद्देश होता. डॉ. मुणगेकर समितीने 1 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांचा अहवाल सरकारला सादर केला. यात कोकणात जागतिक दर्जाचे मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यावेळी 600 कोटींची खर्च असल्याचे नमूद केले होते. तो खर्च आता एक हजार कोटींवर गेला आहे.

Kokan University of Fishery, Dr. Bhalchandra Mungekar
Anand Niragude Resign : आरक्षणावर चर्चा होण्यापूर्वीच मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांचा राजीनामा

डॉ. मुणगेकर समितीच्या अहवालाला एक तप उलटले तरीही सरकारने त्यावर सकारात्मक विचार केल्याचे दिसत नाही. वास्तवित कोकण ही पाणीदार भूमी आहे. समुद्रात माशांची विविधता आहे. त्यामुळे मत्स्य विद्यापीठासाठी कोकण ही योग्य भूमी आहे. त्यातही विद्यापीठाचे मुख्य केंद्र रत्नागिरीत झाल्यास ते अतिशय योग्य ठरेल. पण आपल्या लोकप्रतिनिधींचे याकडे कधी लक्ष गेले नाही, अशी खंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

कोकणात मत्स्य विद्यापीठाऐवजी रासायनिक आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प आणण्याचा घाट घातला जात आहे. जगभरातील जैविक विविधता कोकणात असताना त्याकडे दुर्लक्ष करत मत्स्य विद्यापीठाकडे सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे याकडे कोकणातील लोकप्रतिनिधींनीही कधी लक्ष वेधल्याचे किंवा पाठपुरावा केल्याचे निदर्शनास आले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मत्स्योत्पादनात आघाडी तरीही...

कोकणाला 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. राज्यातील एकूण मत्स्योत्पादनात कोकणचा वाटा 75 टक्के आहे. तरीही मत्स्य विद्यापीठ नागपूरला का? असा सवाल कोकणवासीय विचारत आहेत. नाही म्हणायला प्रचंड विरोधानंतर 17 नोव्हेंबर 2000 रोजी सरकारने नोटिफिकेशन काढून नागपूरचे मत्स्य विज्ञान महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापीठाला संलग्न ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर डॉ. मुणगेकर समिती नेमण्यात आली. पण दुर्दैव म्हणजे डॉ. मुणगेकर समितीचा अहवाल 12 वर्षांनंतरही धुळ खात पडला आहे. या अहवालाकडे ना सरकारचे लक्ष आहे ना कोकणातील आमदार-खासदारांचे!

(Edited by Avinash Chandane)

Kokan University of Fishery, Dr. Bhalchandra Mungekar
Maharashtra Politics: ...आता भाजपचे नेतेही म्हणू लागले, कांदा निर्यातबंदी नकोच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com