प्रकाश आंबेडकर, फडणवीस, ठाकरेंना जबाबाला बोलवावे का? आयोगाचा पवारांना सवाल

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ ला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवली जात आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे १ जानेवारी २०१८ ला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची साक्ष नोंदवली जात आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे.एन पटेल आणि आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर पवारांचा जबाब नोंदवला जात आहे. यावेळी आयोगाकडून पवारांना विविध प्रश्न विचारण्यात आले.

जबाब नोंदवायला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना आयोगपुढे बोलवावे का, असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी या लोकांना बोलवावे या निष्कर्षापर्यंत आयोग आले असेल तर त्यांनी याबाबत ठरवावे, असं उत्तर दिले. एखाद्या वक्तव्यानंतर दंगसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण, या प्रश्नावर पवारांनी संबंधित नेत्याचीच ही जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे.

Sharad Pawar
नियम सर्वांना सारखा, भोंग्याची परवानगी न घेतल्यास कारवाई! अजितदादांनी दिले संकेत

आयोगाकडूनविचारण्यात आलेले प्रश्न व पवारांनी दिलेली उत्तर :

प्रश्न : एखाद्या वक्तव्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं तेव्हा त्याची जबाबदारी कुणाची?

उत्तर : लोकप्रतिनीधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्यात प्रक्षोभक वक्तव्य असता कामा नयेत, जेणेकरून समाजातील विविध स्तरात त्याचे पडसाद उमटून जातीय तेढ निर्माण होईल. जर तसं होत असेल तर त्याची जबाबदारी त्या नेत्याचीच असेल.

प्रश्न : कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी जागा देताना काय गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात?

उत्तर : अश्या सभांना जागा देताना त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून सभेनंतर तिथं कोणतीही तणाव निर्माण झाल्यास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.

Sharad Pawar
घरात बसून घरातल्यांना अल्टीमेटम द्यावा! अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

प्रश्न : तुमचं प्रतिज्ञापत्र कायद्यातील कोणत्या तरतूदींच्या आधारे आहे?

उत्तर : आपल्याकडील उपयुक्त माहिती सरकारला देणं हे आपलं कर्तव्य आहे. जर माझ्या माहितीनं सरकाला काही मदत मिळणार असेल तर ते जरूरीचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे सध्याचं आयपीसी कलम 124 A हे ब्रिटीश कालीन आहे. मात्र हल्ली त्याचा वापर सर्रासपणे चुकीच्या पद्धतीनं होताना दिसतोय. तो थांबायला हवा असं मला वाटत.

प्रश्न - मात्र ही गोष्ट तुम्ही एक राज्यसभा सदस्य या नात्यानं संसदेतही मांडू शकता, मग तिथं हे का मांडत नाही?

उत्तर : होय, बरोबर आहे. मला वाटतं जेव्हा मला योग्य वेळ वाटेल तेव्हा मी तिथंही या गोष्टी मांडेन.

Sharad Pawar
त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली; केवळ 20 मंदिरांकडे भोंग्याची परवानगी

प्रश्न : गंभीर गुन्ह्याची माहिती गोळा करत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे. माहिती मिळाली की कारवाई करावी की माहिती वरिष्ठांना सांगून त्यांच्या सूचनांची वाट पाहावी.

उत्तर : महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल मध्ये अशी परिस्थिती झाली. पोलीस दलाला थेट कारवाई करण्याचे मार्गदर्शक तत्व दिले आहेत त्या आधारे त्यांनी कारवाई करावी.

प्रश्न : प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारला ,त्याचे तीव्र पडसाद उमटले, नुकसान झाले याची जबाबदारी कोणाची?

उत्तर : मला याबाबत काही बोलायचं नाही. इतर कोणी काय भूमिका घेतली कार्यक्रम घेतले, त्याचे काय परिणाम झाले. ह्यात जायची मला आवश्यकता वाटत नाही.

प्रश्न : जबाब नोंदवायला देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांना आयोगपुढे बोलवावे का?

उत्तर : या लोकांना बोलवावे या निष्कर्षापर्यंत आयोग आले असेल तर त्यांनी याबाबत ठरवावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com