कोश्यारी-त्रिवेदींच्या अडचणी वाढणार; उच्च न्यायालयात याचिका दाखल

शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्ततव्यामुळे कोश्यारी चांगलेच अडचणीत आले
bhagatsingh koshyari| Sudhansu trivedi
bhagatsingh koshyari| Sudhansu trivedi
Published on
Updated on

Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ता रमा अरविंद यांच्या वतीने वकील अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी आणि भाजप त्रिवेदी यांच्या मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 (सुधारित) कलम 3 (1)(v) नुसार ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनुसूचित जातींसोबतच सर्वसामान्य लोकांचीही भावना दुखावल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

bhagatsingh koshyari| Sudhansu trivedi
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल आपल्या राज्यात परत जाणार? राजभवनाकडून 'हे' स्पष्टीकरण

दरम्यान, शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्ततव्यामुळे कोश्यारी चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांची राज्यपाल पदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच ते दिल्लीत जाऊन आले. मात्र दिवसेंदिवस कोश्यारींविरोधातील धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 5 सप्टेंबर 2019 रोजी भगतसिंग कोश्यारी यांनी पदभार स्विकारला होता. पण त्यांची ही कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली. आपल्या भूमिकांमुळे आणि वक्तव्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

राज्यपालांच्या वादाचा सिलसिला...

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला हे वक्ततव्य, महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबाबतचं विधान, समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? वक्तव्य, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई-ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही यांसारखी वादग्रस्त विधानं कोश्यारी यांनी केले होती.

आणि आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी महाराज तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील असे वादग्रस्त विधानांनी कोश्यारी कायम वाद ओढवून घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com