हिंदू की मुस्लिम? क्रांती रेडकरने तो फोटोच शेअर केला...

मलिक यांनी वानखेडेंवर बनावट जात प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता.
Kranti Redkar, Sameer Wankhede
Kranti Redkar, Sameer Wankhedesarkarnama

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan) आता एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि ड्रग्ज प्रकरणातला पंच प्रभाकर साईल यांनी आरोप केले आहेत. आता वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर आपल्या पतीच्या बचावासाठी पुढे सरसावली आहे. मलिक यांनी समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्यावरुन केलेल्या आरोपांना क्रांती रेडकरने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Kranti Redkar, Sameer Wankhede
वानखेडेंना अडचणीत आणणारा प्रभाकर साईल आता मुंबई पोलिसांच्या संरक्षणात

नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देत क्रांती यांनी ट्विट केले आहे की, ''मी आणि माझे पती समीर आम्ही दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केलेले नाही. आम्ही दोघेही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडील देखील हिंदू आहेत ज्यांनी माझ्या मुस्लिम सासूशी लग्न केले, सध्या त्या या जगात नाहीत. समीरचे पहिले लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झाले होते. मात्र, त्यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. समीर आणि माझे लग्न 2017 मध्ये हिंदू विवाह कायद्यांतर्गत झाले." असेही म्हटले आहे.

Kranti Redkar, Sameer Wankhede
Kranti Redkar, Sameer Wankhedesarkarnama

29 मार्च 2017 रोजी समीर वानखेडे यांनी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत लग्न केले. क्रांतीने प्रकाश झा यांच्या गंगाजल या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. या शिवाय तिने २२ मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री किंवा चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. समीर आणि क्रांती यांच्या दोन मुली जैदा आणि जिया आहेत.

Kranti Redkar, Sameer Wankhede
फरार किरण गोसावी पुढे आला; म्हणाला मी समीर वानखेडेंना...

मलिक यांनी वानखेडेंवर बनावट जात प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. जन्म प्रमाणपत्राची प्रत त्यांनी ट्विटरवर शेअर केली होती. त्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असे ट्विट केले होते. मलिक यांनी समीर यांचा पहिला विवाह मुस्लिम मुलीसोबत झाल्याचेही सांगितले आहे. मात्र, वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com