लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली, डॉ. म्हणाले...

गेल्या महिनाभरापासून ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
Published on
Updated on

मुंबई : गेल्या महिनाभरापासून ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून आयसीयूमध्ये असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचा सुरु आहेत. लतादीदींवर उपचार सुरु असून, त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती ब्रीच कैंडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेही (Raj Thackeray) त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. आठवडाभरापूर्वी, लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वृत्त डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र शनिवारी, ५ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली. लता मंगेशकर यांच्याबाबतचे हे वृत्त समोर आल्यानंतर त्यांचे चाहत्यांचीही काळजी वाढली आहेत. लता दीदींना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना न्यूमोनिया देखील झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Lata Mangeshkar
भाजपचे शहराध्यक्ष मुळीकांना राष्ट्रवादीच्या जगताप-टिंगरेंचा मतदारसंघातच दणका!

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतित समदानी यांनी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची बातमी आहे. मात्र लता दीदी उपचारांना प्रतिसाद देत असून डॉक्टर सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

https://www.sarkarnama.in/video-story/lata-mangeshkars-health-condition-has-deteriorated

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com