Mansoon Session : अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपदावरून पेच; काँग्रेस करणार दावा?

Ncp Crisis News : कधीपर्यंत विरोधीपक्ष नेत्याची निवड होणार?
Ncp Crisis News :  Sharad Pawar
Ncp Crisis News : Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या विधानसभेतील आणि विधानपरिषेदेतील विरोधीपक्षनेत्याचा पेच पुन्हा निर्माण झाला आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही दोन गट निर्माण झाले आहे. यामुळे सभागृहातील पक्षीय संख्याबळाचे समीकरण बदललेले आहे. यामुळे आता विधानसभा अध्यक्ष विरोधीपक्ष नेत्याला (Leader Of Opposition) मान्यता देणार का? देणार असेल तर कधी? याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहे. (Ncp Crisis News

Ncp Crisis News :  Sharad Pawar
Vilas Lande News : माजी आमदार विलास लांडेंना गळाला लावण्याचे शरद पवार गटाचे प्रयत्न, शहराध्यक्षपदाची दिली ऑफर !

उद्या सोमवार पासून (दि.१७ ) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र आता विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न कसा सोडवला जाणार? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेतेपदावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता सत्ताधारी गोटात गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यागटाकडून विरोधीपक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली. मात्र अजूनही यासाठी विधानसभा अध्यक्षांची याला मान्यता मिळालेली नाही. असे असले तरी काँग्रेसकडून आमदारांच्या संख्याबळाच्या निकषावर विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करण्यात येत आहे. यामुळे विरोधीपक्ष कुणाचा होणार, याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काँग्रेसनं गटनेते पदावर दावा करण्याची शक्यता :

विधिमंडळातील विरोधी पक्षामध्ये ज्यांचे आमदार सर्वाधिक त्यांचाच विरोधी पक्षनेता निवडला जातो. अजित पवारांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास ३७ आमदार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 12 जणांविरोधात कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली आहे. आणि याआधीच नऊ आमदारांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. म्हणजेच 21 आमदार आपल्या पक्षात नाहीत, असे शरद पवार गटाचे अधिकृत म्हणणे आहे, असे बोलले जाते. यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्याचे दिसून येते. यामुळे काँग्रेस विरोधीपक्षावर दावा करू शकतो.

Ncp Crisis News :  Sharad Pawar
Sakal-Saam survey : भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के लोकांचा कौल; पण अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवार गटाला १५ टक्के जनतेची पसंती

सभागृहातील विरोधी पक्षनेता हा विरोधी पक्षातल्या सदस्यांचं प्रतिनिधित्व करीत असतो. देशातील संसदभवनात एकूण सदस्यसंख्या किमान एक दशांश तरी संख्याबळ असणारे पक्ष विरोधीपक्षनेते पदावर दावा करू शकतात, अशी एक कायदेशीर अट आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाकडे हे पद दिले जाते. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com