Jayant Patil On Opposition Leader: विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार?; जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

Congress : विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजितदादांनी राष्ट्रवादीवर दावा केला. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत, याबाबतचा अधिकृत आकडा अद्यापही समोर आलेला नाही.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) सरकारमध्ये सामिल झाल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं भाष्य केलं आहे.

Jayant Patil
Maharashtra Cabinet Expansion: 100 नाही 101 टक्का मी मंत्री होणार; आमदार भरत गोगावलेंनी थोपटले दंड

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला जात होता. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आज जयंत पाटील यांनी "संख्याबळ पाहता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणं शक्य असून लवकरच आम्ही त्याबाबत आमच्या सहकारी पक्षासोबत चर्चा करून निर्णय घेऊ ", असं स्पष्ट केलं. त्यामुळे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण असणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Jayant Patil
Mantrimandal Vistar News : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा वार ठरला... 'या' दिवशीचे मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द

दरम्यान, सत्तेत सामिल झालेल्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे या नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत झालेले दिसत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com