उद्धव ठाकरे देणार संजय राठोडांना चेकमेट; बंजारा समाजाच्या नेत्यांशी मुंबईत खलबतं

बंजारा समाजाच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंजारा समाजाते नेते आणि शिंदे सरकारमध्ये अन्न व प्रशासन मंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathod)यांना शह देण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे हे पोहरादेवी येथे जाणार आहेत. दरम्यान, आज बंजारा समाजाच्या नेत्यांनी ठाकरे यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले आहे.

बंजारा समाजाचे नेते राजू नाईक यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे भेट घेतली. समस्त बंजारा समाज आजही शिवसेनेसोबत आहे, असे आश्वासन नाईक यांनी यावेळी दिले. तसेच पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याचा उद्धव ठाकरे यांना आग्रह केला. बंजारा समाजासाठी पोहरादेवी हे धार्मिक स्थळ काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संजय राठोड यांची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

Uddhav Thackeray
राज्याच्या राजकारणात भविष्यात काहीही होऊ शकते, खडसेंच सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्या बंडामध्ये संजय राठोड सहभागी झाले आहेत. संजय राठोड हे बंजारा समाजातील मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळे बंजारा समाज शिवसेनेसोबत होता. त्या समाजाचा पाठिंबा शिवसेनेला कायम राहावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून शिवसेनेसोबत असलेल्या इतर बंजारा समाजातील नेत्यांच्या भेटीगाठी उद्धव ठाकरे घेत आहेत.

Uddhav Thackeray
आमदार सचिन कल्याणशेट्टी सोलापूर भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूड पडली आहे. ४० आमदार १२ खासदार तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारीही त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे गणेशोत्सवानंतर ठाण्यातून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com