CM Eknath Shinde : विरोधी नेत्यांनो नीट राहा; कारण मुख्यमंत्री शिंदेंनी मागवलेत तीन जाडजूड बांबू !

CMO : शिंदेंच्या मिश्किल टिप्पणीनंतर कार्यालयात महाविकास आघाडीतील पक्षांवर रंगले विनोद
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Political News : आमदार फोडण्यापासून थेट शिवसेनाच ताब्यात घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय 'फटकेबाजी'तही माहीर ठरत आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही संधी मिळत तशी आणि तेव्हा शिंदे विरोधकांना तेही ठाकरेंना 'सोलून' काढण्याचीही एकही संधी सोडत नाहीत.

आता तर याच शिंदेंनी जाड, मजबूत आणि लांबलचक तीन 'बांबू' मागवले आहेत. तेही मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांकडून... हे तीन बांबू आपल्या विरोधकांसाठी अर्थात, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांसाठी मागवले नसावेत ना ? असा प्रश्न उपस्थित करून विरोधी नेत्यांना आता सांभाळूनच राहावे लागणार असल्याची गंमतीशीर चर्चा मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) रंगली आहे.

Eknath Shinde
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची तब्बल आठ तास चौकशी; ईडीच्या कार्यालयाबाहेर येताच म्हणाले...

शिंदेंना हव्या असलेल्यांची बांबूची गंमत अशी आहे... ती आता नीट वाचा. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे विरोधकांना भारी ठरत आहेत. सभागृहात आपल्या भाषणांसह माध्यमांपुढे बोलतानाही ते ठाकरे-पवारांना चिमटे काढतात. विरोधकांना (MVA) सुनावताना शिंदे नेहमीच फटकेबाजी करतात. विधीमंडळाचे अधिवेशन भरल्यापासून तर शिंदेही आपल्या शब्दांना धारच लावल्याचे दिसत आहेत.

त्यात, विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात बैठकांत रमलेल्या शिंदेच्या भेटीसाठी भाजपचे माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) आले. ते आपल्यासोबत बांबूपासून तयार केलेली एक जाडजूड बॅग, पाण्याची बाटली, मोबाईल स्टॅण्ड आणि इतर साहित्य घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आले. बैठक संपवून शिंदे हे खास बांबूपासून बनवलेले साहित्य पाहण्यासाठी त्यांच्या खुर्चीजवळ आले. पटेल यांनी आणलेल्या साऱ्या वस्तू शिंदे यांनी पाहिल्या आणि कौतुकही केले.

Eknath Shinde
Jitendra Awhad : तुमची मुलगी ही आमचीही मुलगी; आव्हाडांना फडणवीसांकडून धीर; केली मोठी घोषणा!

मुख्यमंत्री शिंदेच्या कार्यालयात आणलेल्या वास्तू पाहण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती. त्यातही पत्रकारही होते. त्यावेळी पुढची बांबुची बॅग पाहताना शिंदे (Eknath Shinde) यांनी हजरजबाबीपणाची चुणूक दाखविली. शिंदे म्हणाले, "मी यांच्याकडे (पाशा पटेल) तीन जाड बांबू मागितले आहेत." यावेळी त्यांनी तीन या शब्दावर जोर दिला. शिंदे यांच्या या मिश्किल टिप्पणीवर मुख्यमंत्री कार्यालयात हशा पिकला.

शिंदे यांनी तीनच बांबू मागितल्याने ते कशासाठी आणि कोणासाठी असावेत, हे जाणण्यासाठी आता राजकीय पंडितांची गरज नसावी... अर्थात, शिंदे फडणवीस सरकारविरोधात दंड थोपटलेल्या नेत्यांसाठीच असावेत, अशी शक्कल लढवून अनेकांनी विनोद केला. तसेच यापुढच्या काळातील राजकीय संघर्षांत शिंदे हे विरोधकांना सोडणार नसल्याचेही त्यांनी केलेल्या विनोदातूनही स्पष्ट होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com