Priya Berde : राष्ट्रवादीला रामराम : प्रिया बेर्डेंची भाजपमध्ये नव्या इनिंगला सुरूवात!

Priya Berde : प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.
Priya Berde
Priya BerdeSarkarnama
Published on
Updated on

Priya Berde : मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मराठीतले लाडके अभिनेते दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या त्या पत्नी आहेत. यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ncp) कार्यरत होत्या. आता त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे.

Priya Berde
Uday Samant News : संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या फोटोवर उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले...

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाल्या आहेत. यापूर्वी प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होत्या. आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.

Priya Berde
Uday Shelke News : अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

प्रिया बेर्डे या दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटातून काम केले आहे. 'शी ही बनवाबनवी''झपाटलेला, जत्रा इत्यादी चित्रपटातून त्यांनी अभिनय केला आहे. अनेक मराठी -हिंदीमालिकांमधून त्यांनी अभिनयातून चुणूक दाखवली आहे. त्यांच्या ग्लॅमरस प्रतिमेचा भाजपला राजकीय दृष्टीने फायदा होईल का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com