मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांचे एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र चालूचं आहे. काही दिवसापूर्वी सोमय्या यांनी राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते.
राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujeet Patkar)यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याप्रकरणी पाटकर यांनी सोमय्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सोमय्यांनी राऊत (Sanjay Raut)आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 100 कोटींच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला आहे.
किरीट सौमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडे चौकशी आणि तक्रार करण्याची मागणी केली. पाटकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नोकरी मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. लाइफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाने भागीदारी फर्म स्थापन केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी राऊतांवर केला. सोमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रार केली असून चौकशीची मागणीही केली आहे.
सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे वाइन व्यवसायातील भागीदार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या मुली पुर्वशी आणि विधिता संचालक असलेल्या कंपनीत सुजीत पाटकर भागीदार असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे.
याआधीही सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन कंपनीत भागीदारी केल्याचा आरोप केला होता. राऊत यांची उद्योगपती अशोक गर्ग यांच्या वाईन कंपनीत भागीदारी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. या व्यवसायात त्यांची मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी या कंपनीत संचालक पदावर आहेत. वाइन व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे मॉल्स आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाला संजय राऊत समर्थन देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. (Legal notice to Kirit Somaiya from Sujeet Patkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.