Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणूक अटळ? आज फैसला; आमच्याकडे पुरेसे संख्याबळ, महायुतीच्या भूमिकेनंतर...

Legislative Council Election Will be Unopposed: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.
Devendra Fadnavis-Vidhan Parishad BJP Candidate
Devendra Fadnavis-Vidhan Parishad BJP Candidate Sarkarnama
Published on
Updated on

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. विधान परिषद निवडणुकीबाबत (Vidhan Parishad Election) महायुतीची भूमिका स्पष्ट केली आहे.

"आमचे पुरेसे संख्याबळ आहे, त्यामुळे आम्ही 9 उमेदवार ठेवणार, महायुती आपला उमेदवार मागे घेणार नाही," असे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

महायुतीच्या भूमिकेनंतर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच ही निवडणूक बिनविरोध होईल.

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुंबईत हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात राजकारणात पुन्हा फोडाफोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची आपल्या आमदारांवर करडी नजर आहे.

महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने प्रज्ञा सातव यांनाच उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक व पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शेकापचे नेते जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com