Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : मुस्लिम मतांची भाजपला धास्ती? अजितदादांकडून दिल्लीत इफ्तार पार्टी; CAA बाबत चर्चा करणार...

Ajit Pawar Iftar Party news : मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांशी सीएए कायद्याबद्दल संवाद साधण्यात येणार आहे.
Published on

Delhi News : गेल्या चार वर्षांपासून गुंडाळून ठेवलेल्या सीएए कायद्याला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अधिसूचना काढून मान्यता देण्यात आली. यानंतर आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. मुस्लिम समाजात यावरून अस्वस्थता असल्याचे दिसून येते. यावर आता मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्याची मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे देण्यात आल्याचे समजते. (Latets Marathi News)

अजित पवार गटाकडून इफ्तार पार्टी -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजधानी दिल्लीमध्ये मुस्लिम समाजासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. याच इफ्तार पार्टीमध्ये मुस्लिम समाजामध्ये सीएए कायद्याबद्दल असणारी अस्वस्थता दूर करण्यासाठी संबोधन करण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांशी सीएए कायद्याबद्दल संवाद साधण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंडियन इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये या इफ्तार पार्टीसाठी स्वत: अजित पवार उपस्थित राहणार आहेत. सीएए कायद्यावर मुस्लिम समाजासोबत चर्चा करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात सुमारे 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या -

दरम्यान, बिहारमध्ये (Bihar) गेल्या वर्षी जातीय सर्वेक्षण करण्यात आले. यात आकडेवारीनुसार बिहारमध्ये जवळपास 17 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. राजकीय जाणकारांच्या मते नितीश कुमार भाजपसोबत गेले त्याच वेळी मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष मते त्यांच्यापासून दूर गेली असे मानण्यात येते.

आंध्र प्रदेश या राज्यात जवळपास 7 टक्के एवढे मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे, ओडिशामध्ये मुस्लिमांचे प्रमाण 6 टक्के आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात जवळपास 12 टक्के मुस्लिमांची लोकसंख्या असल्याचे मानले जाते. यामुळे भाजपसोबत (BJP) गेलेल्या मित्रपक्षांपासून मुस्लिम मते दुरावली तर त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com