Bhiwandi Lok Sabha Constituency : निलेश सांबरेंचं काम करता म्हणून दोन जणांना बेदम मारहाण, भिवंडीत नेमकं काय घडलं?

Nilesh Sambhare News : जखमींना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा जीवघेणा हल्ला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे.
Nilesh Sambhare Supporter
Nilesh Sambhare SupporterSarkarnama

Bhiwandi Political News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुबंईसह कल्याण, पालघर, ठाणे आणि भिवंडीतही मतदान होत आहे. मुंबई राखण्यासाठी महायुतीसह आघाडीने सर्व ताकद पणाला लावली आहे. भिवंडीत भाजपचे कपिल पाटील तर शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे. मात्र अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्याबाबतही मोठी चर्चा भिवंडीत आहे. या मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 20) मतदान सुरू असताना सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच दौलत बांगर आणि जयवंत बांगर गंभीर दुखापत झाली आहे. ते जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचे काम करतात, या रागातून त्यांच्यावर भुवन पाडा रस्त्यावर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या चार चाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. सध्या जखमींना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा जीवघेणा हल्ला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सकाळपासून मुरबाडमध्ये मतदान शांततेत पार पडले होते. मात्र दुपारनंतर काही ठिकाणी वातावरण तंग झाल्याने पोलिस अलर्ट झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Sambhare Supporter
Income Tax Raid : दुकान चपलांचं, पण सोफा, बेड, पिशव्या भरून नोटांचे बंडल; IT अधिकाऱ्यांचे डोळे फिरले

दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील, शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून निलेश सांबरे निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र हा मतदारसंघ शरद पवारांनी आपल्याकडे घेतल्यानंतर सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे सांबरे हे कुणाची मते घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Nilesh Sambhare Supporter
Nashik Constituency : नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत ; सिन्नरमध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com