Chitra Wagh Vs Sushma Andhare : राज ठाकरेंवर बोलण्याची सटरफटरांची लायकी नाही; वाघांनी अंधारेंना डिवचलं!

Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे काय आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे....
Chitra Wagh Vs Sushma Andhare
Chitra Wagh Vs Sushma AndhareSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये लावरे तो व्हिडीओ म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर अंधारे यांच्याकडूनही पलटवार करण्यात आला होता. या वादात आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. (Latest Marathi News)

चित्रा वाघ म्हणाल्या, राज ठाकरेंवर बोलणे इतकी या सटरफटरांची लायकी नाही. राज ठाकरे यांनी स्वतःच्या जीवावर स्वतःचा अस्तित्व निर्माण केले आहे. राज ठाकरे काय आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. बाकी सटरफटर काय बोलतात, हे फार महत्त्वाचं नाही," अशा शब्दात वाघ यांनी अंधारेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले राज ठाकरे?

सुषमा अंधारे यांचा बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलत असल्याचा एका जुना व्हिडिओ दाखवत राज यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला होता. राज ठाकरे म्हणाले, "मला त्यांच्या क्लिप्सचं काही घेणंदेणं नाही. पण माननीय बाळासाहेबांबत वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलावर दिल्यानंतर लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्त्या करता, पक्षाच्या नेत्या करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम आहे हे सांगता?' असे राज ठाकरे ((Raj Thackeray) म्हणाले.

सुषमा अंधारेंचा पलटवार काय?

"मिस्टर राज, मी तुमच्यासारख्या सुपाऱ्या घेत नाही. त्यामुळे माझ्याविषयी जरा जपून बोला. मी ग्रामीण भागातली आणि गरीब कुटुंबातली आहे. मी चक्रवाढ व्याजासह सगळ्याची परतफेड करते. याची जाणीव ठेवा," असा सज्जड दमच अंधारे यांनी भरला. 'राज ठाकरे सध्या भाजप आणि त्यांच्या जमवलेल्या गर्दीचा प्रचार करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अडचणीत आणण्यासाठी जमलेल्या कळपाचे समर्थन राज ठाकरे करीत आहे. मात्र लक्षात ठेवा कळप लांडग्यांचा असतो वाघीण एकटीच येत, असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com