Maharashtra Political News : काँग्रेसने चौथ्या यादीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोऱ्या जाणाऱ्या चार जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. चंद्रपूर या वादाच्या जागेचा निर्णय झालेला नाही. तेथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) की प्रतिभा धानोरकर हा वाद अद्याप सुटलेला नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यभर प्रचाराची जबाबदारी असल्याने भंडारा-गोंदिया या मतदारसंघात स्वत: न लढता डॉ. प्रशांत पडोळे यांना रिंगणात उतरवले आहे.
नागपुरात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी सामना करण्यासाठी माजी महापौर आणि शहर काँग्रेसचे प्रमुख विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे या लगतच्या रामटेकमधून लढतील. त्यांच्या कास्ट सर्टिफीकेटचा वाद मार्गी लागल्याने नितीन राऊत (Nitin Raut) यांचे नाव मागे पडले. बर्वे या मुकुल वासनिक, सुनील केदार यांच्या निकटवर्तीय आहेत. गडचिरोली या गेल्या काही निवडणुकात भाजपला साथ देणाऱ्या मतदारसंघात डॉ. नामदेव किरसन यांना संधी देण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील महाविकास आघाडीत काही जागांबाबत तिढा आहे. तो सोडवण्यावर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट भर देत आहे. ज्या जागांवर मार्ग निघत आहे, तेथील जागांवर उमेदवार जाहीर करताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसने राज्यातील सात उमेदवारांची घोषणा केली होती. तर चौथ्या यादीत फक्त विदर्भातील चार जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीत (MVA) काही जागांबाबत खल सुरू आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. काँग्रेसने निर्णय होईल तसा जागांवरील उमेदवार जाहीर करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच्या यादीत राज्यातील पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, अमरावतीला बळवंत वानखेडे, कोल्हापूरसाठी शाहू छत्रपती, नंदुरबार गोवाल पाडवी, नांदेड वसंतराव चव्हाण, लातूरसाठी शिवाजीराव काळगे यांची उमेदवारी जाहीर केली. तर आता विदर्भातील चार जागांवरील उमेदवारांची नावे फायन केली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.