Mumbai News : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीसह रणनीती आखण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. टीका-टिप्पणीलाही धार चढत आहे. सत्ताधारी-विरोधक यांच्यात जोरधार घमासान होत असतानाच मित्रपक्षही एकमेकांना आव्हान देत आहेत. शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपण बारामतीत शड्डू ठोकणारच, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही शिवसेनेला आव्हान देऊ लागले आहेत. (Latest Marathi News)
विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात हुंकार भरला आहे. होय, पवारांचा पराभव करणारच, असं जाहीर आव्हान शिवतारेंनी दिले आहे. ते आता अपक्ष बारामतीतून शड्डू ठोकणार आहेत. शिवतारेंचा हा निर्णय महायुतीवर उमटणार आहेत. जर शिवतारेंनी माघार घेतली नाही तर शिंदेंच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अजितदादा गटाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे, असे चित्र दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही शिवतारेंनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. शिवतारे महायुतीचा धर्म तोडून जर बारामतीत उभे राहिले तर त्याचे परिणाम राज्यभर दिसतील. शिंदेंच्या एकाही उमेदवाराचा प्रचार आपला पक्ष करणार नाही, अशी आक्रमक भूमिका बनसोडे यांनी घेत मुख्यमंत्री शिंदेंनाच चॅलेंज दिले आहे.
विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामतीतून बंडखोरी करण्यावर ठाम आहेत. असे झाले तर याचे परिणाम राज्यभर दिसतील. मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतरही ते ऐकणार नसतील तर आम्हीही शिंदेंचे उमेदवार जिथे असतील तिथे महायुती म्हणून प्रचार करणार नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.