Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीमध्ये भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंसोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते. दिल्लीत दोन नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं? बैठकीचा मनसेला नेमका काय फायदा होणार? याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, "दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली हे खरं आहे. या बैठकीत महायुती संबंधी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मात्र अद्याप काहीही ठोस असं ठरलं नाही. आणखी एका बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सध्या केवळ फलदायी चर्चा झाली आहे इतकंच सांगतो." दरम्यान, पत्रकारांनी नेमक्या कोणत्या जागेबाबत चर्चा झाली असं विचारलं असता नांदगावकरांनी सांगितलं की, दोन जागांबाबत चर्चा सुरु आहे, यामध्ये दक्षिण मुंबईच्या जागेचादेखील समावेश आहे. मात्र याबाबतच्या निर्णयासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुम्हाला उमेदवारी देणार आहे का? असा प्रश्न विचरला असता नांदगावकर म्हणाले, "कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. त्यासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. मी दोनवेळा लोकसभा लढवली आहे. आताही जर राज ठाकरेंनी गडचिरोलीतून निवडणूक लढण्यास सांगितली तर तिथून लढेन.कारण आम्हाला आदेश ऐकण्याची सवय आहे."
संजय राऊतांच्या टीकेलाही नांदगावकरांनी प्रत्तुत्तर दिलं. ते म्हणाले, "संजय राऊत सतत मीडियात असल्यामुळे त्यांनी विचार करुन बोलावं, दुसऱ्या पक्षावर टीका करताना विचार करायला हवा. आम्हाला काय भूमिका घ्यायची हे माहिती आहे. ते काय बोलतात याला आम्ही महत्व देत नाही."
(Edited By - Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.