Lok Sabha Election : अजितदादांच्या साथीने भाजपची मोठी खेळी; सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे निशाण्यावर

Bjp Strategy For 2024 Election With Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात 'मिशन 45' साठी कंबर कसली आहे....
Ajit Pawar vs Supriya Sule
Ajit Pawar vs Supriya SuleSarkarnama

Maharashtra Politics News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी केली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोबत घेऊन भाजप शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) तिसऱ्यांदा यश मिळवायचे असेल तर कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा गड हा भाजपला जिंकावा लागेल. यासाठी भाजपने 'मिशन 45' लक्ष्य निश्चित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाताशी घेऊन ते साध्य करण्याचा विडा उचलला आहे. या मिशनमध्ये पहिले टार्गेट बारामती आणि शिरूर हे मतदारसंघ आहेत. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी जिवाचे रान केले जाणार आहे.

Ajit Pawar vs Supriya Sule
Lok Sabha Elections : अजित पवारांची लोकसभेसाठी 'पावरफुल' रणनीती; शिंदे गटाची धडधड वाढवणार!

बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यात बारामती आणि शिरूर हे दोन मतदारसंघ म्हणजे अजित पावरांच्या राष्ट्रवादीचा जीव की प्राण आहेत. या मतदारसंघातील निकालावर त्यांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद ही पश्चिम महाराष्ट्रात आहे. याच ताकदीला सुरुंग लावण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. यासाठी केंद्राकडून फडणवीस-बावनकुळे यांना सर्व रसद पुरवली जाईल. शरद पवारांच्या या बालेकिल्ल्यावर ताबा मिळवल्यावर विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात 'कमळ' फुलवण्यासाठी भाजप पुढचे पाऊल टाकेल.

सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात?

सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास पवार घरातील कुणालातरी उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली होती. पण या चर्चेला अजित पवारांनी पूर्णविराम दिला होता. पण सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. पुण्यातील वारजे भागात सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संसदेचे चित्र असलेला बॅनर लागले. यामुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा आहे. पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार, असे समीकरण आहे. सुनेत्रा पवार राज्यातील पावरफुल घराण्यातील पावरफुल सूनबाई. यामुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने विडा उचलला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असा करणार अमोल कोल्हेंचा पराभव?

अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील चार आमदार हे अजितदादांकडे आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघाचे माजी खासदार आणि सध्या शिंदे शिवसेनेत असलेले शिवाजी आढळराव पाटील हे दादा गटातील मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे या भागात हे दोन्ही नेते एकत्र असल्याने कोल्हेंची धाकधूक वाढवणारी आहे. शिवाजीराव यांना तिकीट हवे असल्यास त्यांना शिवसेनेचे धनुष्यबाण सोडून हाती घड्याळ बांधावे लागेल. एकूणच अजित पवार गट बारामतीप्रमाणे ही जागा जिंकून शरद पवारांना शह देण्यासाठी डावपेच खेळेल आणि भाजपला हेच हवे आहे.

Ajit Pawar vs Supriya Sule
Ajit Pawar On Sharad Pawar : अजितदादांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; "साहेबांनीच सांगितलं सत्तेत जा, मी राजीनामा देतो..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com