लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रदेश प्रभारींची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यांसाठी पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब हरियाणाचे प्रभारी असतील. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे पंजाब-चंदीगडचे प्रभारी असतील. बिहारचे माजी मंत्री मंगल पांडे यांना पश्चिम बंगालचे प्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय संबित पात्रा यांना पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक बनवण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप नेत्या पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली असून विनोद तावडे यांच्यावर बिहार राज्याची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून पंकजा मुंडे यांच्यावर मध्यप्रदेश राज्याची सहप्रभारी म्हणून जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने १५ राज्यांतील पक्ष प्रभारी म्हणजेच प्रमुखांची नावे आज संध्याकाळी जाहीर केली. हरियाणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेले विनोद तावडे यांच्याकडे आता भाजपच्या हातून निसटलेल्या बिहारची त्याहून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळची तर राष्ट्रीय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे राजस्थान प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आहे त्या जबाबदाऱ्या काढून घेतल्यावरही पक्ष किंवा नेतृत्वाबद्दल किंचितही कुरकूर न करता पक्षकार्यात शांतपणे झोकून देणे, हे भाजपच्या मराठी नेत्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.
दरम्यान पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशाचे सहप्रभारीपद देण्यात आले आहे. त्यांना पी मुरलीधर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल. भाजप नेतृत्वाने सध्या सारा जोर लावलेल्या तेलंगणाचे प्रभारीपद दिल्लीतील तेजतर्रार नेते तरुण चुग यांच्याकडे तर सहप्रभारीपद अरविंद मेनन यांच्याकडे देण्यात आले आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांची पंजाबमध्ये ‘बदली‘ करण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांनी तेथील नवे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांच्या मार्गात येऊ नये यादृष्टीने त्यांना थेट हरियाणात आणण्यात आले आहे. पक्षप्रवक्ते संबीत पात्रा यांच्याकडे आसाम-त्रीपुरा वगळता सारा ईशान्य भारत देण्यात आला आहे. पुढील वर्षी निवडणुका असलेल्या छत्तीसगडच्या प्रभारीपदी ओम माथूर तर पश्चिम बंगालच्या प्रभारीपदी मंगल पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय व महिला नेत्या आशा लकडा हे पांडेय यांचे सहप्रभारी असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.