मुंबई - राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( व्हॅट )मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी भाजपच्या वतीने स्वागत केले आहे. राज्यात आता पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. ( Madhav Bhandari congratulates state government: Reduction in petrol and diesel prices )
प्रसिद्धी पत्रकाद्वारे भंडारी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भाजपने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भाजपची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भाजपच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले असून 'सबका साथ, सबका विकास' हा पंतप्रधान मोदी यांचा मंत्र शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल, असा विश्वास भंडारी यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.