Swara Bhaskar, Madhuri Dixit, Poonam Mahajan
Swara Bhaskar, Madhuri Dixit, Poonam Mahajan Sarkarnama

Mumbai North Central : बाॅलिवूडच्या हिरोईनचा रील नाही, रियल सामना रंगणार; स्वराविरोधात पूनम की माधुरी ?

Bollywood Actresses : महाराष्ट्रातील लोकसभेच्या या मतदारसंघात हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज हिरोईन आमने-सामने येण्याचे चिन्हं निर्माण झाले आहे. या मतदारसंघात भाजपविरोधात काँग्रेस असा सामना असेल.
Published on

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात दोनदा विजयी झालेल्या पूनम महाजन यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीने तिकीट मागितले आहे, तर भाजपमध्येदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मराठमोळ्या माधुरी दीक्षित यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पूनम महाजन यांना तिकीट घोषित होते की नाही, यावर विचार मंथन सुरू आहे. उत्तर मध्य मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने त्या ठिकाणी यंदा लोकसभेसाठी स्वरा भास्कर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.

पूनम महाजन यांनी तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्याचे सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नात आता काँग्रेसतर्फे या मतदारसंघात कोणाला तिकीट दिले जाते हेदेखील महत्त्वाचे असेल. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटणार असताना महाविकास आघाडीतील इतर कोणी या मतदारसंघावर दावा केल्यास मोठी अडचण होऊ शकते. काँग्रेसचे अनेक इच्छुक या ठिकाणी आपला दावा करत असताना अचानक स्वरा भास्कर यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेत उत्तर मध्य मुंबईसाठी तिकीट मागितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Swara Bhaskar, Madhuri Dixit, Poonam Mahajan
Shahu Chhatrapati On PM Modi : काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच शाहू छत्रपती पंतप्रधानांवर बरसले

पूनम महाजन या 2014 मध्ये एक लाख 86 हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. पण, त्यांना 2019 मध्ये विजयाचे गणित मात्र जुळविताना मोठी अडचण गेली होती. शिवसेना भाजप युतीत त्यांना 1 लाख 30 हजारांचे मताधिक्य होते. आता तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासोबत भाजप नाही. शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजप असून, या ठिकाणी चुरशीची लढत होईल.

या मतदारसंघातून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना भाजप तिकीट देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. असे असताना पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत अतिशय किचकट हा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथे प्रचारापासून विजयापर्यंत अतिशय खडतर मार्ग आहे.

स्वरा भास्कर यांनी या ठिकाणी तिकीट मागण्यामागे मोठे कारण आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांचे प्राबल्य आहे. पूनम महाजन यांचे मतदार संघाकडे दूर्लक्ष पाहता या मतदारसंघात माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे. त्यात काँग्रेसतर्फे स्वरा भास्कर यांनी तिकीट मागितल्याने लोकसभा निवडणूक अतिशय रंगतदार होईल. महाराष्ट्रातील नेते दिल्लीत नेण्याच्या प्रयत्नात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा या मतदारसंघात आहे. ते लोकसभेत जातात की महाराष्ट्रात राहतात हे पाहण्यासारखे असेल.

महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी ही जागा काँग्रेसच लढविणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती, तर दहा हजारांवर मते नोटाला पडली होती. काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा आहे. माजी खासदार प्रिया दत्त यांनी अद्याप उमेदवारी मागितल्याची घोषणा केली नाही. त्यात स्वरा भास्कर यांनी दिल्लीत रमेश चेन्नीथला यांना तिकीट मागितल्याची माहिती असून, माधुरी दीक्षित विरोधात स्वरा भास्कर हा 'रील नाही रियल' सामना लोकसभा निवडणुकीत रंगण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 400 पारचा नारा दिला आहे. त्याचबरोबर महिला सशक्तीकरणावर जोर दिला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप उमेदवाराबद्दल काय अंतिम निर्णय घेतात हे पाहण्यासाखे ठरेल, तर काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेससाठी कोणाला तिकीट या मतदारसंघात देण्यास तयार होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

R

Swara Bhaskar, Madhuri Dixit, Poonam Mahajan
Arvind Kejriwal News : केजरीवाल राजीनामा देणार की जेलमधून सरकार चालवणार? काय आहे नियम?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com