Ashadhi Ekadashi CM Worship : आषाढी एकादशीची महापुजा 'या' मुख्यमंत्र्यांनी केली सर्वाधिक वेळा

Ashadhi Ekadashi And Maharashtra CM : शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीसांचाही समावेश
Sharad Pawar, Vilasrao Deshmukh, Manihar Joshi, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Vilasrao Deshmukh, Manihar Joshi, Devendra FadnavisSarkarnama

Ashadhi Ekadashi News : राज्यात शेकडो वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त संतांचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. पंढरपुरातील हा सोहळा राज्यातील सर्वात मोठा असतो. यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा केली जाते. महाराष्ट्राचे प्रथम नागरिक या नात्याने आषाढी एकादशीच्या महापुजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. मुख्यमंत्री ही पुजा सपत्नीक करतात. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. २९) ही महापुजा केली. (Latest Political Marathi News)

या शासकीय पुजेच्या माध्यमातून मुख्यंमत्री राज्य आणि शेतकरी कल्याणाची पांडुरंगचरणी प्रार्थना करतात. आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मुख्यमंत्र्यांना या महापूजेचा मान मिळालाय. त्यापैकी सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. विलासराव देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सहा वेळा विठमाऊलीची शासकीय पूजा केली आहे. त्यांच्यानंतर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांना चार वेळा या महापुजेचा मान मिळाला आहे.

Sharad Pawar, Vilasrao Deshmukh, Manihar Joshi, Devendra Fadnavis
Ashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे ; "बळीराजाला चांगले दिवस येऊ दे.."

राज्यात युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तीन वेळा ही शासकीय पुजा केली आहे. उद्धव ठाकरे यांना दोन वेळा तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेही यंदा सलग दुसऱ्या वर्षी शासकीय महापूजा होणार आहे. तर मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे यांना प्रत्येकी एक वेळा या महापूजेचा मान मिळाला आहे.

राज्याबाहेरीलही काही मुख्यमंत्र्यांना या पुजेचा मान मिळालेला आहे. यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांना दोनदा या पुजेचा मान मिळाला आहे. दिग्विजय सिंह दरवर्षी आषाढीनिमित्त पांडुरंगचरणी लीन होतात. दरम्यान, काही राज्यपालांनाही या महापुजेचा मान मिळालेला आहे. यात राज्यपाल म्हणून शंकरदयाळ शर्मा, सी. सुब्रमण्यम यांना प्रत्येकी एक वेळा मान मिळाला आहे.

Sharad Pawar, Vilasrao Deshmukh, Manihar Joshi, Devendra Fadnavis
Talathi Bharti : तलाठीपदाच्या जाहिरातीत गोंधळात गोंधळ; आयुक्तालयाने मागविला खुलासा !

दरम्यान, मुख्यमंत्री असूनही काहींना या पुजेची संधी मिळालेली नाही. पी. के. सावंत, बॅरिअस्टर ए. आर. अंतुले, सुधाकर नाईक आणि बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री पदावर असताना एकदाही पूजेची संधी मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनाच नाही तर मंत्रीपदी राहिलेल्या नेत्यांनाही या शासकीय महापूजेचा मान मिळालाय. यात शालिनीताई पाटील, राजारामबापू पाटील, बाबासाहेब भोसले, माणिकराव भामले, भाऊसाहेब वर्तक, आबासाहेब पारवेकर, छगन भुजबळ अशा अनेक मंत्र्यांनी या महापुजेला उपस्थिती लावली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com