Maharashtra Assembly Live : मोदी-शिंदेंच्या दाढीवरून भुजबळांची तुफान टोलेबाजी

जीएसटीच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal News Sarkarnama

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Live) दुसऱ्या दिवशी आज (गुरुवारी) अधिवेशनात जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्न यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विविध वस्तुंवरील जीएसटीवर केंद्र सरकारवर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.

'काळी दाढी अन् पांढरी दाढी' यावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी तुफान टोलेबाजी केली. छगन भुजबळ हे विधानसभेत जीएसटीच्या मुद्द्यावर बोलत होते. जीएसटीच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून पंतप्रधान मोदी यांना भुजबळ यांनी यावेळी टोला लागवला आहे. त्यामुळे विधानसभेत हशा पिकला. "आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा खूप सन्मान होतो," असा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भुजबळांना लगावला.

Chhagan Bhujbal News
Ashish Shelar : भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत, शेलारांनी शिवसेनेला डिवचलं

सभागृहात भाषण करताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हात दाखवित म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचे पाहून मला आनंद झाला, पण मला आनंद होण्यामागे कारण वेगळेच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की, दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यामध्येही सफेद दाढी, काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून संपुर्ण हिंदुस्तानावर आहे. अशा शब्दात भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही..

"जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट सुरु आहे. एक गोष्ट जीएसटीतून सुटलेली नाही. नशीब आमच्या भाषणावर जीएसटी लावला नाही. सर्व सामान्यांवर फार वाईट परिणाम होत आहे. अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच स्कुल चले हम जीएसटी के साथ अशा घोषणा लोक देत आहे," अशी टीका भुजबळांनी यावेळी केली.

"सरकारने जीएसटीत चांगली वाढ झाली आहे. संकलन वाढलं आहे. जीएसटी परिषदेत सगळ्या राज्यांचे लोक असतात मानतो, पण गेल्या काही दिवसांत बातम्या आल्या की अनेक अन्नधान्याच्या आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला, याचा फटका शेवट्या माणसाला बसतोय,"अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com