budget 2022:विरोधक आक्रमक होणार ; आघाडी सरकारची रणनिती तयार

यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे आहे. यंदा ३ मार्च ते २४ मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.
maharashtra assembly budget 2022
maharashtra assembly budget 2022sarkarnama

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय (maharashtra assembly budget 2022) अधिवेशनाला आजपासून (गुरूवार) सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या कामकाजात प्रामुख्याने राज्यपालांचे अभिभाषण, राज्यपालांच्या भाषणावर अभिनंदनाचा ठराव आणि भाषणावर चर्चा असा पहिल्या दोन दिवसाचा कार्यक्रम आहे.

मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण ,राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची झालेली ईडी चौकशी, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची ईडी चौकशी, ऊर्जामंत्र्यांनी दिलेले वीज तोडण्याचे आदेश, मदत व पुनर्वसन विभागाची ढिसाळपणा,या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सज्ज झाले आहे. सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष आज पुन्हा पाहायला मिळणार आहे.

याच अधिवेशनात 2022-23 साठीचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प 11 मार्च (शुक्रवार) रोजी सभागृहात सादर केला जाईल. अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एकीकडे महागाईचा भडका उडत आहे. अशावेळी राज्य सरकार जनतेला कशाप्रकारे दिलासा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच या अधिवेशनाकडे राज्यातील अवघ्या जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे आहे. यंदा ३ मार्च ते २४ मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.

maharashtra assembly budget 2022
राणें पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार

विधानसभा अध्यक्षपदाच्या (election of assembly speaker)निवडणूकीबाबत ९ मार्च रोजी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांना पत्र पाठविले आहे. पण या पत्राला अद्याप राज्यपालांनी उत्तर दिलेले नाही. आता पुन्हा राज्यपालांना स्मरणपत्र देण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे.

पहिल्याच दिवशी म्हणजे ३ मार्चला राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३ मार्चला सकाळी ११ वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहातून दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करणार आहेत.राज्यपालांच्या अभिभाषणाने पहिल्या दिवसाची सुरूवात होईल. तर विधानसभा आणि विधान परिषदेतील दिवंगत आमदारांचा शोक प्रस्तावही पहिल्याच दिवशी मांडण्यात येईल.

maharashtra assembly budget 2022
अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल

जमीन खरेदी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा अद्यापही राजीनामा घेण्यात न आल्याने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. याचविषयी पत्रकार परिषदेत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांन स्पष्ट केलं की, अटकेचं कारण योग्य नसल्याने नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाम आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com