राणें पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार

नारायण राणे यांना चार मार्च, नितेश राणेंना तीन मार्च रोजी चैाकशीसाठी हजर राहण्यासाठी मालवणी पोलिसांनी नोटिस बजावली आहे.
nitesh rane, disha saliyan,narayan rane
nitesh rane, disha saliyan,narayan ranesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (disha saliyan)प्रकरण आता कुठल्या दिशेला जाणार सांगता येत नाही. यावरुन राजकारण तापलं आहे. भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane), आमदार नितेश राणे (nitesh rane)यांनी दिशाबाबत केलेल्या विधानावरुन दिशाच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दिशा सालीयन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रकरणी राणे पिता-पुत्रांवर मालवणी (malvani police station)पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून काढल्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

या प्रकरणी नारायण राणे यांना चार मार्च, नितेश राणेंना तीन मार्च रोजी चैाकशीसाठी हजर राहण्यासाठी मालवणी पोलिसांनी नोटिस बजावली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर दिशा सालीयनचा  मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आलं आणि राणेंनी थेट राज्यातील एका युवा मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहे.

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे .

''दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे व नितेश राणे हे दिशा सालियनसोबत मृत्यूपूर्वी झालेल्या बलात्काराबाबत नेहमीच विधान करीत आहेत. ''आमचे वकील उत्तर देतील,'' असे नितेश राणेंनी सागितले.

मालवणी पोलीस ठाण्यातून महिला आयोगाने दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा समावेश आहे. दिशा सालियनवर बलात्कार झाल्याचा शवविच्छेद अहवालामध्ये उल्लेख नाही. यानंतर नारायण राणे यांच्यावर महिला आयोगाने खोटे आरोप केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

nitesh rane, disha saliyan,narayan rane
अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल

''महिलांवर कितीही अत्याचार झाले, बलात्कार झाले तरीही विरोधी पक्षाने बोलू नये अशी परिस्थिती महाविकास आघाडी सरकार आणण्याचा प्रयत्न केला आहे

मला जी नोटीस मिळाली आहे त्याबद्दल वकीलाशी कायदेशीर चर्चा करून त्याबद्दलचे उत्तर वकिलामार्फत आम्ही देणार आहोत,''असे राणे म्हणाले.

''जी सत्य परिस्थिती आहे ती जनतेसमोर आणि लोकांसमोर येईल, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत राज्यात एका महिलेवर अत्याचार झाला असेल, चुकीची घटना घडली असेल तर तिला न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. तिच्या आई वडिलांवर कोण दबाव टाकतो. महापौर त्यांच्या घरी गेल्या, महिला आयोगाच्या सदस्या गेल्या आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला याची माहिती संबंधित यंत्रणांना देणार आहोत. आमच्याकडेही काही माहिती आहे सीडीआर आहे आणि फोटो आहेत याची माहिती आम्ही कोर्टात देणार आहोत,'' असे नितेश राणे म्हणाले.

आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राणे अडचणीत आले होते. तर नितेश राणे हे देखील संतोष परब हल्ल्यानंतर अडचणीत होते. आता तर दिशा प्रकरणामुळे राणे पिता पुत्र अडचणीत आलेत. त्यामुळे आता दिशाबाबत केलेले वक्तव्य राणेंना भोवणार का? आणि त्यांना अटक होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com