BJP Booth Exit Poll : भाजपच्या बूथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना धक्का, मिळू शकतात एवढ्या जागा

BJP booth exit poll impact on Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल येत असून, महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार याची उत्सुकता आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 नोव्हेंबरला जाहीर होत आहे. निकालाच उत्सुकता असतानाच राज्यात वेगवेगळ्या संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर झालेत.

बहुतांश संस्थांनी महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे. यात भाजपच्या बूथ एक्झिट पोलने लक्ष वेधले असून, त्यानुसार अजित पवार यांना सर्वाधिक धक्का बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

भाजपच्या बूथ एक्झिट पोलनुसर भाजप (BJP) पक्ष हा राज्यात सर्वात मोठा पक्ष असणार आहे. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या एक्झिट पोलवर बोलणे टाळले. परंतु आढावा घेतल्यानुसार लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
Hitendra Thakur : तावडेंच्या आरोपांवर ठाकूर बरसले; म्हणाले, 'काल भिजलेल्या कोंबडीसारखे...' पाहा VIDEO

विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना भाजपने यावेळी बूथ रचना मजबूत केली होती. भाजपच्या बूथ रचनेनुसार राज्यात सर्वात मोठा पक्षा भाजप असेल. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असून, सरकार स्थापन होईल. महाविकास आघाडीला (MVA) राज्यात 100 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना 24 जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवला आहे. त्यामुळे इतर पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Ajit Pawar
Nana Patole on Vinod Tawde : भाजपची मान्यता रद्द करा; पटोले म्हणाले, 'त्या हाॅटेलात तावडेंचा विग घालून कोणी गेलं होत का?' पाहा VIDEO

भाजप बूथ लेव्हल एक्झिट पोलनुसार महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 ते 22 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. भाजपचा बूथ एक्झिट पोलचा अंदाज अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक आहे. भाजपच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यात 164 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

भाजप बूथ लेव्हल एक्झिट पोलनुसार भाजपला 90 ते 100, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 ते 45 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 ते 25 जागा मिळतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसला 40 ते 45, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 35 ते 40 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 25 ते 30 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com