Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; म्हणाले, 'मी कोणाच्या बापाचा प्रेशर घेत नाही' पाहा VIDEO

Case registered against Hitendra Thakur over bold statement: भाजप नेते विनोद तावडे यांनी मुंबईत पैस वाटप प्रकरणाच्या आरोपावर पत्रकार परिषद घेणारे BVA नेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल.
Hitendra Thakur
Hitendra ThakurSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मुंबई विरारमधील एका हॉटेलमधून पैसे वाटप केल्याच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. या कार्यकर्त्यांनी तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विरारमधील एका हॉटेलमध्ये घेरलं होते.

तब्बल तीन तास हे नाट्य रंगले होते. तिथं बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आल्यावर आणखीच गोंधळ उडाला. विनोद तावडे यांच्या नोटप्रकरणावर हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतल्याने त्यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजप (BJP) नेते विनोद तावडे आणि त्यांचे काही कार्यकर्ते येऊन बसले होते. याची माहिती हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांनी तिथं धाव घेतल्यानंतर तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पैसे वाटपाचा आरोप करत गोंधळ घातला. हा गोंधळ तब्बल तीन तास सुरू होता. कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर तिथे BVA नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकरू पोचले. यामुळे गोंधळात भर पडली.

Hitendra Thakur
Nana Patole on Vinod Tawde : भाजपची मान्यता रद्द करा; पटोले म्हणाले, 'त्या हाॅटेलात तावडेंचा विग घालून कोणी गेलं होत का?' पाहा VIDEO

हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांच्या या प्रकारावर गंभीर प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केले. ही पत्रकार परिषद सुरू असताना निवडणूक (Election) आयोगाने त्यांना सूचना आली की, पत्रकार थांबवा. यानंतर त्यांची पत्रकार परिषद सुरू राहिली. या प्रकाराची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Hitendra Thakur
Vinod Tawde : मोदी-अदानी संबंधांचा राहुल गांधींनी 'सेफ' उघडला; भाजपच्या तावडेंचा आमच्याकडे 'कपाट'भर असल्याचा इशारा ...पाहा VIDEO

हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे सापडलेल्या डायऱ्यांत पैशांचा उल्लेख असल्याचा आरोप केला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "सांगण्यासारखे काहीच राहिले नाही. पैसे वाटप, बैठका घ्यायच्या असतात का? भाजपच्या अंगावर येईल , त्यांच्याकडे बोलायला काही नव्हतं". त्यामुळे आचारसंहितेत पत्रकार परिषद घेत नाहीत.

जिल्हाधिकारी म्हणतात की पत्रकार परिषद घेता येत नाही. मी कोणाच्या बापाचा प्रेशर घेत नाही. माल भरपूर आहे. आता मला 50 फोन आले. जे आहे ते मिटवा. आपण मित्र आहोत, मी म्हणालो, सोडून दिलं. वेगवेगळ्या रुममध्ये कुठे 10 लाख मिळाले. कुठे 2 लाख कुठे 5 लाख मिळाले रुपये मिळाले, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.

दहा लाख रुपये सापडले

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे विरारमधील ज्या हॉटेलमध्ये उपस्थित होते तिथे मोठा गदारोळ झाला. विनोद तावडेंवर इथं पैसे वाटप झाल्याचा आरोप झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इथं चांगलाच गोंधळ घातला. यावेळी भाजप कार्यकर्ते व 'BVA'च्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली.

'BVA'च्या कार्यकर्त्यांनी तिथं पिशव्यांमधील पाकिटं काढून त्यातून पैसे बाहेर काढले. ते पैसे तिथं विनोद तावडे यांच्या दिशेन उधळले गेले. मात्र भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, या हॉटेलमधील वेगवेगळ्या रूममधून पोलिसांनी दहा लाख रुपये जप्त केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com