Maharashtra Assembly Live पालघरच्या जिल्ह्याच्या आरोग्य प्रश्नांवरून अजित पवार संतापले

Maharashtra Assembly Live : आजच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी व विरोधतांत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar Latest Marathi News
Ajit Pawar Latest Marathi NewsSarkarnama

पालघरमध्ये आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात असे अनेक दुर्गम भाग आहेत, ज्यामध्ये अद्यापही आरोग्य सुविधा पोहोचू शकत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना काहीच उत्तर देता आले नाही.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असा आरोप विरोधकांनी केला. विधानभवानाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आजही सरकारविरोधात घोषणाबाजी करत पोस्टरबाजी केली. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहटी, चलो गुवाहटी, असे पोस्टर विरोधकांनी झळकावले. विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन करत घेरण्याचा प्रयत्न केला. तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टीवरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

आमदार नमिता मुंदडा यांची अंबाजोगाईतील अवैध धंद्यांविरोधात कारावाईची मागणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू, आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रकरणी पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली, आज लक्षवेधी सूचना माध्यमातून त्यांनी ही मागणी केली.

मी नाराज नाही, मंत्रिपदासाठी माझी नाराजी नाही. व्यक्तिगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी माध्यमांना सांगितले.

Maharashtra Assembly Live
Maharashtra Assembly Livesarkarnama

मुंबई : शिंदे सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या (बुधवारी) पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधकांत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही उपरोधिकपणे त्यांचे चिमटे काढले.

विशेषतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवल्यानतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तेवढ्याच आक्रमकपणे त्यांच्यावर पलटवार केला. यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी व विरोधतांत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com