Ajit Pawar : अब्दुल सत्तारांच्या उत्तरावर अजितदादांचे प्रश्नचिन्ह, म्हणाले..

Maharashtra Assembly Winter Session 2022 : प्रकरण लक्षात आल्यानंतर कुणाच्या काळात होतं हे बघण्याचा कारण नाही,"
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Maharashtra Assembly Winter Session 2022 : गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी उत्तर दिले आहे. ते उत्तर समाधानकारक नसल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अजित पवार म्हणाले, "अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2022) प्रस्तावातील तिसरा मुद्दा हा मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंबंधी आहे. गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जे उत्तर दिले आहे, ते अजिबात समाधानकारक नाही. सरकारने थातुरमातून उत्तर देऊन वेळ काढू नये. राज्यातील महिला अत्याचारांतही वाढ झाली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत,"या प्रस्तावावर आज तसेच उद्याही चर्चा होईल. त्यानंतर सरकारला प्रस्तावाला उत्तर देईल, असे अजित पवारांनी म्हणाले.

अधिवेशनात टीईटी गैरव्यवहारावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गैरव्यवहार आघाडी सरकारच्या काळात झाला असल्याचे बुधवारी सांगितले. त्यावर अजित पवार म्हणाले, "घोटाळा आमच्या काळात असो किंवा कुणाच्याही काळात असो ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेला ते केलं पाहिजे, अनेक महसूल राज्यमंत्री होती त्यांचे प्रकरण पुढे आले आहेत. प्रकरण लक्षात आल्यानंतर कुणाच्या काळात होतं हे बघण्याचा कारण नाही,"

Ajit Pawar
Ajit Pawar On Bawankule: "करेक्ट कार्यक्रम करू," असं बावनकुळे म्हटल्यापासून मला झोप येत नाही ; अजित पवारांचा टोमणा

अजित पवार म्हणाले, "बावनकुळे यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू असं सांगितलं तेव्हापासून मला झोप येत नाही," "आम्ही राजकारणातून संन्यास घेतलेला बरा," असा खोचक टोला अजित पवारांनी बावनकुळे यांना लगावला.

उद्या (शुक्रवारी) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावर अजित पवार म्हणाले, "आम्ही तीन आठवडे अधिवेशन घ्या, अशी मागणी केली होती.अधिवेशन तीन आठवडे घेऊ असे सांगण्यात आले होते. परंतु आज अंतिम आठवडा बाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. "विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी आणखी एक आठवडा पाहिजे होता," असे अजितदादा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com