सिल्वर ओक हल्ला प्रकरण : भाजपनं बड्या पोलीस अधिकाऱ्याकडे दाखवलं बोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर गेल्या शुक्रवारी (ता.८) एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला.
Silver Oak Attack
Silver Oak Attack Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर गेल्या शुक्रवारी (ता. ८) एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC) हल्ला केला. एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर प्रथमच हल्ला झाल्याने त्याचे तीव्र पडसाद अजूनही राज्य़भर उमटत आहेत. त्यानंतर काही पोलिस अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पण असा हल्ला होणार असल्याचा गोपनीय अहवाल मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष शाखेने (स्पेशल ब्रॅंच-एसबी) चार दिवस अगोदर म्हणजे ४ एप्रिललाच दिला होता. (Silver Oak Attack)

विशेष शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांनी हे पत्र सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil) यांना लिहिलेले आहे. भाजपनेही (BJP) या पत्रावरून आता नांगरे पाटील यांना लक्ष्य केलं आहे. हल्याची शक्यता असल्याचे नमूद करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती त्यात वर्तवण्यात आली होती. त्यामुळे वेळीच ही माहिती मुंबई पोलिसांना त्यांच्या विशेष शाखेने दिली होती, हे स्पष्ट झाले आहे. म्हणजे त्यावर लागलीच कार्यवाही झाली असती तर हा हल्ला टळला असता. एसटी कर्मचारी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करणार आहेत, हे या गोपनीय अहवालवजा पत्रातून सांगत पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाला वेळीच सावध करण्यात आले होते.

Silver Oak Attack
नॉट रिचेबल सोमय्या अखेर अवतरले अन् गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत म्हणाले...

आंदोलनाच्या चौकशीचा फार्स

आंदोलनाच्या चौकशीचा फार्स केला जात असल्याचा आरोप भाजपने ट्विटमध्ये केला आहे. 'गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलजी, कशाला सिल्वर ओक आंदोलनाच्या चौकशीचा फार्स करताय? ज्या विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते मविआच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षा पुरवत नाहीत आणि तरीही तुम्ही त्यांनाच चौकशी प्रमुख नेमता. जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का?, असं ट्विट भाजपनं केलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने ते सिल्वर ओकसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मलबार हिल येथील वर्षा हे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील मातोश्री हा खासगी बंगला, सह्याद्री शासकीय गेस्ट हाऊस, परिवहनमंत्री अनिल परब यांचे सरकारी व खासगी निवासस्थान, मुंबई उच्च न्यायालय येथे तीव्र आंदोलन करू शकतात, असे विशेष शाखेच्या या गोपनीय पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यासाठी आझाद मैदानात ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांच्या जोडीला खासगी वाहने आणि रेल्वेने आणखी एसटी कर्मचारी येणार असल्याचा अंदाजही त्यात वर्तवण्यात आला होता. त्यामुळे वाशी आणि मूलूंड चेकनाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची सूचना त्यात केली गेली होती.

चार तारखेला मंत्रालय, तर ५ तारखेला सिल्वर ओकवर आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा व माहिती या सिक्रेट रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. भाजपनेही याच पत्रावरून नांगरे पाटील यांना लक्ष्य केलं आहे. पत्र ट्विट करून भाजपने नांगरे पाटील यांच्या चौकशी समितीत समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com