गुजरात निवडणुकीत महाराष्ट्र भाजपची फौज! 12 आमदारांवर 33 मतदारसंघाची जबाबदारी

Gujarat Election News : गुजरात विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर झाल्या आहेत
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Gujarat Election News : गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजले. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे भाजपने (BJP) प्रचारात आघाडी घेतली आहे. गुजरातमध्ये प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज दाखल झाली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) भाजपमधील अनेक नेतेमंडळी गुजरातचे दौरे करत होते.

आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात एकूण बारा आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. गुजरातमधील सहा जिल्ह्यांच्या 33 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आल्याते सांगण्यात आले आहे.

मुंबईत गुजराती (Gujarat) मतदार मोठ्या प्रमाणात आहे. येथील गुजराती समाजाच्या नेत्यांशी गुजरातमध्ये असलेला कनेक्ट लक्षात घेऊन त्यांना या मोहिमेवर पाठवण्यात आले आहे. या शिवाय गुजरातला लागून असलेल्या जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील आमदारांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात मनीषा चौधरी, संजय सावकारे, संजय केळकर, पराग अळवणी, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, निरंजन डावखरे, सुरेश भोळे, राहुल ढिकले, राजेश पाडवी, उमा खापरे हे आमदार असणार आहेत.

महाराष्ट्रातून गेलेले नेते त्यांना वाटून दिलेल्या मतदारसंघांमध्ये नागरिकांशी संवाद साधत त्यांचा फीडबॅक घेतात. भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख यांच्या बैठका, गाव, शहरांतील प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी. त्याच प्रमाणे प्रत्येग भागात सर्व लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल हे ही नेते मंडळी पाहत असतात. भाजपची प्रचार यंत्रणा मोठी आहे. इतर राज्याती नेते निवडणुका असलेल्या राज्यात जाऊन मोठ्या प्रमाणात प्रचार करताना दिसतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com