Ajit Pawar Maharashtra Budget 2024: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बजेटमधील महत्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना वीज बिल माफ

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live Updates: आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-पवार-फडणवीस सरकारने आजचे बजेट सादर केले.
Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024 Sarkarnama

Maharashtra Budget 2024 : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-पवार-फडणवीस सरकारने आजचे बजेट सादर केले. बजेटमध्ये महिला, शेतकरी, बचत गटासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. ८ लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप देणार आहे.

 • मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात: 'लाडकी बहीण योजने'त महिन्याला मिळणार दीड हजार रुपये?

 • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना:महिन्याला मिळणार दीड हजार रुपये?

 • मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजना: या योजनेनुसार पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

 • व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना ८ लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबियातल्या मुलींना १०० टक्के फी भरण्याचा निर्णय

 • शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजना

 • मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करणार

 • राज्यात गाव तिथे गोदाम योजना

 • एक जुलैपासून दूध उत्पादकांना ५ रुपये अनुदान

 • बच्चत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ

 • पडीक जमिनीवर बाबू लागवड प्रकल्प राबवणार

 • शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार

 • राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर

 • वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या वाढवणार

 • गरजू युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा

 • कृषीपंपाचे संपूर्ण वीज बील माफ करण्याचा निर्णय

 • तृतीय पंथियांना सर्व योजनांच्या लाभ मिळणार

 • दिव्यांगांसाठी आनंद दिघे घरकुल योजना

 • पोलिस पाटील यांच्या मानधनात वाढ

 • तृतीयपंथियांना सरकारी सेवेत सामावून घेणार

 • पेट्रोलवरील कर १ टक्क्यांनी कमी करा

 • माळशेज घाटात पर्यटकांसाठी मुव्हिंग गॅलरी उभारणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com