Harshvardhan Sapkal: निवडणूक आयोगाचा कारभारच ‘दस नंबरी’; मतदार याद्या निर्दोष का करीत नाही? सपकाळ संतापले

Harshvardhan Sapkal ON Maharashtra election Commission:लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Harshvardhan Sapkal ON Maharashtra election Commission
Harshvardhan Sapkal ON Maharashtra election Commission Sarkarnama
Published on
Updated on

Election Commission: राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही, असे सांगत विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या या 'कारभारा'टीका केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुबार मतदारांवरुन दिलेल्या उत्तरामुळे राज ठाकरेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. आता 100 टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोगावर हल्लाबोल केला आहे.

निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबईत टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर सपकाळ बोलत होते. मतचोरी करून भाजपाचे सरकार आलेले आहे, या मतचोरी विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली होती परंतु निवडणूक आयोग मात्र यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshvardhan Sapkal ON Maharashtra election Commission
Prashant Kishor: बिहारी राजकारणात ‘जनसुराज’चा बदलाचा सूर ; 'किंगमेकर’ की नवे ध्रुवीकरण

कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीसह इतर आवश्यक मदत करण्याची मागणी यावेळी सपकाळ यांनी केली. या बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, रजनी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष तथा गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री के. सी. पाडवी, आ. डॉ. विश्वजित कदम, खासदार डॉ. कल्याणराव काळे, खासदार रविंद्र चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, माजी आमदार मोहन जोशी, अॅड. गणेश पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होणार असून या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com