Nana Patole: प्रकल्पांवर महाराष्ट्राचा हक्क नव्हता का? पटोले यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Maharashtra Industries moved to Gujarat Nana Patole criticized Mahayuti:महाराष्ट्रात अनेक सोयीसुविधा उपलब्ध असूनही महाराष्ट्रामध्ये मोठे प्रकल्प न देता ते गुजरातला का पाठवले जातात याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवून नेल्याचा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकार हे केंद्रातल्या मोदी सरकार समोर झुकत माप घेत आहे, अशी टीका करत त्यांनी अनेक प्रकल्पांची आठवण करून दिली. महाराष्ट्रातून खूप मोठे प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्र (Maharashtra)विकासाला मुकत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

गुजरात (Gujarat)आणि इतर राज्यांमध्ये प्रकल्प गेल्याने महाराष्ट्र मोठ्या गुंतवणुकीला मुकला आहे. खरंतर महाराष्ट्र भारतातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मजबूत राज्यांपैकी एक राज्य आहे आणि त्याचे राज्याच्या महसुलात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याने अनेक बँकांची मुख्यालये इथे आहेत, शेअर बाजार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रातून महसूल प्राप्त होतो. महाराष्ट्रातून अनेक पिकांची आयात निर्यात केली जाते. त्यामुळे राज्याला कृषी महसूल मिळतो. महाराष्ट्रात अनेक सोयीसुविधा उपलब्ध असूनही महाराष्ट्रातला मोठे प्रकल्प न देता ते गुजरातला का पाठवले जातात याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता समूह आणि तैवान-आधारित इलेक्ट्रॉनिक्स फॉक्सकॉन या उत्पादन कंपनीने पुण्यातील तळेगाव येथे १.६३ लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह सुविधा उभारण्याची योजना जाहीर केली होती.

फॉक्सकॉन मोबाइल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनासाठी प्रकल्प उभारत होते. परंतु काही कारणांमुळे तो प्रकल्प महाराष्ट्रात न उभारता आता गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या निव्वळ गैरव्यवस्थापनामुळे प्रकल्प गमावल्याचे आरोप विरोधी पक्ष करत आहेत. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगारची संधी उपलब्ध झाली असती.

Nana Patole
Nana Patole News: जातीनिहाय जनगणनेला प्राधान्य देऊ आणि आरक्षणाचा प्रश्न तडीस लावू - नाना पटोले

टाटा-एअरबस विमान प्रकल्पदेखील गुजरातमध्ये हलवण्यात आला. एअरबस आणि टाटा समूहाचा एक संघ या प्रकल्पाअंतर्गत भारतीय हवाई दलासाठी C-२९५ या मालवाहू वाहतूक विमानांची निर्मिती गुजरातमधील वडोदरा येथे करण्यात येणार आहे. या २२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा करताना भारतात पाहिल्यांदाच खाजगी कंपनी कडून लष्करी विमानाचे उत्पादन केले जाईल असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

नागपूरमधील मिहान परिसरात हा प्रकल्प बनवण्यात येणार असल्याची चर्चा होती. अशीच काहीशी गत आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची (आयएफएससी) झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कारकीर्दीत हा प्रस्ताव मांडला गेला होता. सर्व प्रकारच्या वित्तीय सेवांशी संबंधित सरकारी आणि खाजगी संस्थांची कार्यालये या एकाच केंद्रात असणार आहेत.

सगळ्या आर्थिक मोठ्या संस्था या केंद्रात असतील आणि मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने ह्या केंद्राचे मुख्यालय इथेच होणार असे ठरले होते. परंतु २०१४ मध्ये केंद्रात सत्ताबदल झाला आणि २०१७ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या वित्त केंद्राचे मुख्यालय हे गांधी नगरच्या ‘गिफ्ट सिटी’ मध्येच असेल असे लोकसभेत जाहीर केले.

मुंबईत २६/११ चा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली होती, त्यात नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे एनएसजी आणि समुद्री तटाच्या सुरक्षेसाठी मरीन पोलिस अशीही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यामुळे एनएसजी आणि नॅशनल मरीन पोलिस अकॅडमी मुंबई जवळ पालघर येथे प्रस्थापित करण्याची योजना होती. पण केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर या दोन्ही संस्था गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला.

Nana Patole
Nana Patole News : सत्तेची हाव नाही, जनतेसाठी काम करत राहणे हीच इच्छा: नाना पटोले

नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठ्या रिन्यूएबल अॅण्ड ग्रीन एनर्जी कंपनीचा (रिन्यू) सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाअंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. महाराष्ट्रातील उद्योजकांकडून आकरण्यात येणारे सर्वाधिक वीजदर हे प्रकल्प जाण्याचे मुख्य कारण समजले जात आहे. परंतु राजकीय उदासीनता आणि अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे. तसेच ‘महानंदा’ या दूध ब्रॅंडचा सुद्धा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील सहकारी दूध उत्पादक संघाची संस्था असणारी, महानंदा आर्थिक अडचणीत सापडल्याने याचा समावेश राष्ट्रीय डेअरी विकास मंडळात करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प जात असताना त्यात महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठी सहकारी दूध उत्पादक संस्था असणाऱ्या महानंदा डेअरीचे व्यवस्थापनही गुजरातमध्ये असणाऱ्या एका संस्थेकडे जात असल्याने महाराष्ट्रातील लोक नाराज आहेत. प्रकल्पांच्या या यादीत मुंबईतील हिरेबाजारही सुरतला स्थलांतरित केला गेलाय.

२०१८ मध्ये पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला असून महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Nana Patole
Nana Patole : "भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार"- नाना पटोले

अशा अनेक प्रकल्पांची हीच गत झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच असे आरोप केले आहेत की “महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला हलवले जात आहेत.” विशेषत: त्यांनी अमरावतीतल्या प्राइम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाइल रिजन आणि अ‍ॅपेरल पार्क (पीएम मित्र) प्रकल्पाचे दोनदा भूमिपूजन झाल्याबद्दल टीका केली.

प्रथम जुलै २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते आणि सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्याच प्रकल्पाचे भूमिपूजन केले. “निवडणुकांपूर्वी जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे केले जात आहे. मोठे प्रकल्प हलवण्यात आले तसेच निवडणुकीनंतर हा प्रकल्पदेखील गुजरातला हलवला जाऊ शकतो. हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात आहेआणि महाराष्ट्राचे नुकसान होत आहे,” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Facebook link Nana Patole

https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL

Instagram link Nana Patole

https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==

Twitter link Nana Patole

https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09

YouTube link Nana Patole

https://www.youtube.com/@nanapatoleinc

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com