लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. या धक्क्यांतून सावरण्यासाठी काँग्रेसने डॅमेज कन्ट्रोलची योजना आखली आहे. त्यासाठी काँग्रेसने थेट लोणावळा गाठले आहे. या दोन दिवसांत काँग्रेस नेत्यांचं ब्रेन वॉशिंग केले जाणार आहे.
काँग्रेस कमिटीने लोणावळ्यात दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराला सुरुवात झाली असून, काँग्रेसमधील देशातील दिग्गज नेते मार्गदर्शनासाठी येणार आहेत.
काँग्रेसला 'हात' दाखवला आहे. नेत्यांना काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या कलामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. म्हणून काँग्रेस कमिटी, आमदार, नेते यांची मानसिकता बदलण्यासाठी काँग्रेसने या शिबिराचे आयोजन केले आहे.
मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि अशोक चव्हाण अशा तीन बड्या नेत्यांनी महिनाभरात
ऐन राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तोंडावर काँग्रेस सोडल्यामुळे पक्ष नेतृत्वाला धक्का बसला आहे. म्हणूनच डॅमेज कन्ट्रोल करण्यासाठी काँग्रेसचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कार्यकर्ते वाढवण्यावर भर देण्यासाठी तसेच प्रचारासाठी लोणावळ्यात दोन दिवसांचे शिबिर घेतले आहे.
काँग्रेसमध्ये संधी दिली जात नसल्यामुळे पक्ष सोडत असल्याचे वरील तिन्ही नेत्यांनी आरोप केला आहे, तर काँग्रेसचे आणखी आमदार सत्तेत येतील, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पार्श्नभूमीवर काँग्रेस आमदारांना काय वाटते, त्यांच्या कायम मागण्या आहेत, पक्षात कोणते बदल केले पाहिजेत हे त्यांच्याकडून जाणून घेतले जाणार आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे डॅशिंग नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D.K. Shivkumar), तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala), पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) मार्गदर्शन करतानाच काँग्रेसी विचारांचा डोसदेखील देणार आहेत. शिवाय काँग्रेसचे आणखीही नेते मार्गदर्शन करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीत (MVA) आता काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर या पक्षातही गळती सुरू झाली आहे. म्हणून नेत्यांचे ब्रेन वॉश करून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात अजून कसा वाढवता येईल, काँग्रेसमध्ये इन्कमिंग कसे वाढेल, यावर या शिबिराच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील.
कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन प्रचार करणे, बूथ कमिटीने अधिक सक्रिय होणे आणि त्यासाठी प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कार्यकर्ते जोडून प्रचारावर मोठा भर देण्यात येणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्रमधील ज्वलंत विषयांना वाचा फोडण्यावर भर देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील, असे स्पष्ट केले जाईल.
या शिबिरापूर्वी काँग्रेसमधील एक वेगळीच खदखद समोर आली आहे. या शिबिरासाठी राज्यभरातील 300 पेक्षा जास्त नेते आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे, पण प्रदेश सचिवांना निमंत्रित न केल्यामुळे सर्व प्रदेश सचिव नाराज झालेत. पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आमचं ऐकत नाहीत. त्यामुळे आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करण्याशिवाय पर्याय नाही, असंही काही सचिवांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचा व्हाॅट्सअॅप ग्रुपही ओन्ली फॉर अॅडमिन करण्यात आल्यामुळे तक्रारीचा सूर वाढलाय.
काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे या शिबिरात नेमके किती आमदार उपस्थित राहतात, याकडेही लक्ष दिले जाणार आहे. कालच्या विधानभवनाच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी त्यांचे लेखी उत्तर प्रदेशाध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे आज किती आमदार दांडी मारत आहेत आणि किती उपस्थित राहतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.