महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी? आरोग्य विभागाने थेट आकडेच सांगतिले...

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे.
Maharashtra Lockdown Updates by Health Department

Maharashtra Lockdown Updates by Health Department

Sarkarnama

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. बुधवारी राज्यात 26 हजार 538 रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून राज्य सरकारकडून (State Government) निर्बंध वाढविण्याचा विचार सुरू आहे. राज्यात लॉकडाऊन (Lockdown) करण्याबाबतच धोरणही निश्चित करण्यात आल्याचे समजते. आरोग्य विभागाकडून (Health Department) याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

देशात पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्राला (Maharashtra) सर्वाधिक फटका बसला. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रतच झाले आहेत. त्यामुळे सरकारकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या असून रात्रीची जमावबंदी करण्यात आली आहे. तसेच पुण्यासह मुंबई व इतर शहरामध्ये काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण लॉकडाऊनचा निर्णय आताच घेतला जाणार नाही. (Maharashtra Lockdown Updates by Health Department)

<div class="paragraphs"><p>Maharashtra Lockdown Updates by Health Department</p></div>
दुसऱ्या लाटेपेक्षा भयानक स्थिती : भारतात कोरोना संसर्गाचा वणवा

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लॉकडाऊन करण्यासारखी स्थिती नाही. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची दैनंदिन मागणी 800 मेट्रिक टनाहून अधिक वाढल्यास महाराष्ट्रात लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध लागू करण्याचा विचार केला जाईल. तसेच राज्यातील रुग्णालयांमधील कोरोना बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्यासही याचा विचार होऊ शकतो, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. (Maharashtra Lockdown Updates by Health Department)

सध्याची कोरोना रुग्णांची वाढ फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राहील. या महिन्यात रुग्णांचा उच्चांक होईल. तर मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्या कमी होत जाईल, असंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात 5 हजार 331 रुग्ण बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.55 टक्के एवढे झाले आहे. तर आठ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 5 लाख 13 हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1366 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. बुधवारी राज्यात 144 ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईतील 100 रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 797 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com