Pravin Darekar On Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंची लायकी काय ते महाराष्ट्राला माहिती आहे'; दरेकरांची बोचरी टीका !

Pravin Darekar Criticize On Uddhav Thackeray : "घरकोंबड्या सारखं मातोश्रीत बसून सरकार चालवतो.."
Pravin Darekar On Uddhav Thackeray
Pravin Darekar On Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावरून ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभ्यासावर टीका केली होती. यावर आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. 'देवेंद्र फडणवीसांच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरेंची लायकी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे,' अशा शेलक्या शब्दात दरेकरांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Pravin Darekar On Uddhav Thackeray
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय ? मनोज जरांगेंना भेटणार शिष्टमंडळ

दरेकर म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल द्वेष आणि मत्सर उद्धव ठाकरेंच्या नसानसात भरले आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात. देवेंद्र फडणवीसांची क्षमता, त्यांचा आवाका, त्यांचं ज्ञान महाराष्ट्राला माहिती आहे. आणि उद्धव ठाकरेंची लायकीसुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे. अडीच वर्षे जो मंत्रालयात जावू शकत नाही, शासन समजावून घेऊ शकत नाही. घरकोंबड्या सारखं मातोश्रीत बसून सरकार चालवतो, त्याने दुसऱ्याची लायकी काढणे याच्यासारखा विनोद असू शकत नाही. "

Pravin Darekar On Uddhav Thackeray
Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

अध्यादेश जारी करून अशा प्रकारे आरक्षण देता आलं असतं तर तो उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असा अध्यादेश का नाही काढला? असा सवाल फडणीसांनी विचारला होता.

यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "फडणवीसांचं ज्ञान आणि अभ्यास इतकं तोकडं आहे, असं काही मला वाटलं नव्हतं. कारण- अध्यादेश काढण्याचा अधिकार हा संसदेला असतो. फडणवीसांना मी थोडं तरी ज्ञानी समजत होतो. पण आता असं वाटतं की, ते मंत्रालयाच्या आजुबाजूला फिरण्याच्या कुवतीचे देखील नाहीत," अशा शेलक्या शब्दात ठाकरेंनी टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com