KDMC News: मनसेचे कार्यकर्ते झाले 'मिस्टर इंडिया'; हातात रंगाच्या बादल्या, ब्रश घेऊन उतरले रस्त्यावर, नेमंक काय घडलं?

MNS Protest KDMC Corruption Allegations:मनसे कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकिस आणली, मात्र प्रत्यक्षात स्टेशन परिसरात गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर नसताना ही बिल महापालिकेने दिलीच कशी असा सवाल आता मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
MNS Protest KDMC Corruption Allegations
MNS Protest KDMC Corruption AllegationsSarkarnama
Published on
Updated on

Kalyan: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आह. कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकासह, संतोषी माता रोड आणि काही ठिकाणचे पदपथ, डिव्हायडर रंगवणे व स्वच्छ करण्याचे तब्बल चाळीस लाखांचे बिल कल्याण डोंबिवली महापालिकेने काढल्याचा आरोप मनसेने केला आहे . माहितीच्या अधिकारात मनसे कार्यकर्त्यांनी ही माहिती उघड केली आहे.

महापालिकेच्या कारभाराविरोधात आज मनसेने प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी "मिस्टर इंडियाचे "लाल रंगाच्या चष्मे घातले होते. हातात बादल्या व रंगाचा ब्रश घेऊन प्रतिकात्मक फूटपाथ, डिव्हायडर रंगवत टीडीएमसी व केडीएमसी अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. माहितीच्या अधिकारात मनसे कार्यकर्त्यांनी ही माहिती उघड केली आहे.

MNS Protest KDMC Corruption Allegations
Mumbai Police Commissioner: मुंबईची जबाबदारी 'लेडी सिंघम'वर? ; कोण होणार आयुक्त, चार नावे चर्चेत

मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेल पर्यंत डिव्हायडर धुणे व रंगवण्याच्या कामाचे बिल केडीएमसीने ठेकेदाराला दिले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकिस आणली, मात्र प्रत्यक्षात स्टेशन परिसरात गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर नसताना ही बिल महापालिकेने दिलीच कशी असा सवाल आता मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

केडीएमसीच्या या भ्रष्टाचारा विरोधात मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज 'मिस्टर इंडिया'चा चष्मा घालत हातात ब्रश व कलरची बादली घेऊन स्टेशन परिसरात आंदोलन केलं. यावेळी प्रतिकात्मक डिव्हायडर रंगवत केडीएमसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाहीतर मनसे अधिकाऱ्यांना ठोकणार, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महापालिकेला दिला आहे.

MNS Protest KDMC Corruption Allegations
MNS Protest KDMC Corruption AllegationsSarkarnama

कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकापर्यंत डिव्हायडरच नाही तर मग हे डिव्हायडर रंगवण्याचे धुण्याचे बिल काढले कसे असा सवाल मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी केला. अन्य ठिकाणच्या देखील फुटपाथ आणि डिव्हायडर रंगवण्याचे काम एमसीएचआय या बिल्डराच्या संघटनेला दिले आहे, तो खर्च ती संघटना करणार आहे. त्याचा महापालिकेचा बिलाशी काही संबंध नाही मग त्यांचे बिल देखील केडीएमसीने काढले कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिका अधिकारी स्वतःची तिजोरी स्वतःच घर भरत आहेत. केडीएमसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई केली नाही तर मनसे अशा अधिकाऱ्यांना ठोकणार, असा इशारा भोईर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com