Video Crop Insurance Scam : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची लूट; धनंजय मुंडे संतापले, 'आता कुणाचीही गय...'

Dhananjay Munde : एक रुपयात पीक विमा योजनेच्या नावाखाली सीएससी केंद्र चालक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करतात. कृषी हेल्पलाइनच्या व्हॉट्सअपवर किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarakrnama

Maharashtra Political News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरणे चालू आहे. राज्यात मात्र काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाहून अवैधरित्या काही आगाऊ रक्कम वसूल करतात.

या प्रकारांच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या असून, त्या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार करावी. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

याबाबत 'साम' वृत्तवाहिनीने काही सीएससी केंद्रावर जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी एका रुपयाच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून शेकडो रुपये उकळले जात असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे. सदर केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुंडे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे. तर यासाठी संबंधित केंद्र चालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज 40 रुपये मानधन दिले जाते. मात्र काही केंद्र चालक सात-बारा ऑनलाइन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या विरोधात आता धनंजय मुंडे यांनी अधिक कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

राज्यात खरीपाच्या पेरणी सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेलाही प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. त्याविरोधात सराकार कडक भूमिका घेणार असल्याचा इशाराच कृषीमंत्री मुंडेंनी दिला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मात्र तक्रार करताना पुरावेही सादर करावे लागणार आहेत. यामुळे राज्यात किती तक्रारी येणार आणि त्यावर काय कारवाई होणार, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com