Shinde - Fadnavis Government: शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा !

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार..
Shinde - Fadnavis Government
Shinde - Fadnavis GovernmentSarkarnama

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेचं सरकार पूर्वरत केलं असतं, असे न्यायालयाने म्हंटले आहे. त्यामुळेच राज्यात आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हस्के म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे शिंदे फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार, असं नरेश म्हस्के म्हणाले. सरकारला कसल्याही प्रकारचा धोका किंवा जोखीम नाही. आगामी विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालीच लढणार, असेही म्हस्के म्हणाले.

Shinde - Fadnavis Government
Aditya Thackeray असं का म्हणाले? |Shivasena| Supreme court| Sarkarnama video

दरम्यान गेल्या ११ महिन्यांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय जाहीर केला. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयात हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत आहोत. अध्यक्षांनी लवकरात लवकर आमदार अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असं न्यायालयाने यावेळी जाहीर केलं.

Shinde - Fadnavis Government
Ajit Pawar On SC Verdict : 'रात्री जे बोललो, तसंच घडलं' ; सत्तासंघर्षाच्या निकालावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया..

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात न्यायालयाने हस्तक्षेप करुन नये, हे पुन्हा एकदा खंडपीठाने स्पष्ट केले. आमदारांना अपात्रतेसंदर्भातली नोटीस बजावलेली असतानाही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे सभागृहात झालेल्या कामकाजाची वैधता आमदारांच्या अपात्रतेबाबत होणाऱ्या निर्णयावर अवलंबून राहणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com