'अजूनही वेळ गेलेली नाही' ; स्वत:ला वाघ म्हणवता मग बकरी सारखं बेबे करू नका !

आमदारांची व त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे शिंदे यांनी टि्वट केलं आहे.
sanjay raut, Eknath Shinde
sanjay raut, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या (shivsena)बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना दिलेले संरक्षण महाविकास आघाडी सरकारने काढले आहे. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टि्वट करीत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय आकसापोटी ठाकरे सरकारने हे केलं असल्याचा आरोप शिंदे यांनी आपल्या टि्वटमध्ये केला आहे. (Eknath Shinde news)

१६ आमदारांच्या निवासस्थानाची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतल्याप्रकरणी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. आमदारांची व त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे शिंदे यांनी टि्वट केलं आहे.

याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांना विचारले असता राऊत म्हणाले की, सुरक्षा ही आमदारांनी दिली असते, त्यांच्या कुटुंबियांना नाही. XXला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी ? स्वत:ला वाघ म्हणवता मग बकरीसारखे का पळता ? असा टोलाही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.

"पळून गेलेल्या आमदारांवर 11 कोटी जनतेचा अविश्वास आहे," असेही राऊत म्हणाले. "असं वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात. असं बकरी सारखं बेबे करू नका.सोडून द्या हे सगळं, अजूनही वेळ गेलेली नाही' असं राऊत म्हणाले.

"शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, गुवाहाटीला गेलेले आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, आजची कार्यकारिणीची बैठक देशाच्या राजकारणाला दिशा देणारी आहे. या बैठकीत अनेक नियुक्त्या केल्या जातील," असे राऊत म्हणाले.

विद्यमान आमदारांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रोटोकॉलनुसार देण्यात आलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आली आहे. राजकीय बदला घेण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. प्रोटोकॉलनुसार देण्यात आलेली सुरक्षा तातडीने पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com